पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पूर्वज व सुमेरी लोकांचे पूर्वज यांची एकच संस्कृति फार प्राचीन काळी कोठे तरी असली पाहिजे अशी अंधुक कल्पना त्यांना आली होती. हाच कपना व्यक्त करताना मॅकेंझी म्हणतो:- ___"To students of comparative folk-lore and mythology, these myths (of Sumeria) present many features of engrossing intorest. They are of great antiquity: yet not a few of them seem curicusly familiar. We must not conclude however, that because a European legend may bear resemblance to one transmitted from a cuncil.orm. tablot, it is neccessarily of Babylonian origin. Certain beliefs and myths which were based upon them are older than even the civilization of the Tipro-Euphrates valley. They belong, it would appear, to a stock of common inheritance from an uncertain cultural centre of great antiquity." (प्राचीन दंतकथा व गाथाशास्त्र यांचा तुलनात्मक अभ्यास करणारे संशोधक सुमेरी दंतकथा वाचून फार विचारमग्न होऊन जातील. त्या दंतकथा फार प्राचीन काळच्या आहेत, तरीपण त्यांतल्या काही आपल्याला नित्य परिचयाच्या वाटतात. तथापि अशी एखादी दंतकथा सुमेरी कीलाकृति लिखाणावरून सापडली, म्हणजे लगेच युरोपिअन लोकांनी ती सुमेरी वाङ्मयावरूनच उचलली, अशी आपली चुकीची कल्पना संशोधकांनी करून घेऊ नये. कारण काही समजुती व त्यांवरून रूढ झालेल्या दंतकथा या युफ्रेटिस-टायग्रीस नद्यांच्या टापूलि सुमेरी संस्कृतीहनहि अत्यंत प्राचीन आहेत व त्याचा उगम कोठे तरी अजून अनिश्चित असलेल्या प्रांतांतील संस्कृतीच्या कल्पनासंग्रहांतून झालेला आहे.”). मकेंझीच्या वरील अवतरणांत युरोपिअन दंतकथा सुमेरी कांवरून प्रत्यक्षतः घेतल्या गेल्याबद्दलच्या कल्पनेविरुद्ध जी सावधगिरी ठेवण्यास बजावले आहे, तीच आपणहि भारती दंतकथांबद्दल अर्थातच ठेविली पाहिजे. म्हणूनच माहेंजोदारो व हरप्पा येथील उत्खननानंतर ताबडतोब बँडेल साहेबांनी हिंदी संस्कृती ही सुमेरीवरून उसनी घेतली आहे, व हिंदी ऋषीमुनींचे बापजादे सुमेरियांतील वीरपुरुष होते, असा जो एक भरमसाट सिद्धांत ठोकून दिला व तो खरा आहे हे दाखविण्यासाठी हिंदी संस्कृतीचा काल हजारों वर्षे अलीकडे ओढला, त्याची सदोषता दाखविण्यासाठीच युरोपिअनांच्या या प्रवृत्तीबद्दल निषेधात्मक उद्गार या लेखमालेच्या पहिल्या अंकांत काढले होते. त्यांत त्या लोकांनी प्राचीनसंशोधनाच्या कामी केलेल्या अपूर्व श्रमाबद्दल कृतज्ञताभाव मुळीच नसून त्यांच्या सहेतुक अपसिद्धांताचे खंडण मात्र व्यक्त केले आहे. असो. वरील उताऱ्यांत मॅकेंझीने ज्या इतिहासप्राकालीन अनिश्चित अशा ठिकाणी असलेल्या मानववंशाचा उल्लेख केला आहे. अनिश्चित वाटणारे स्थान म्हणजेच