पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/८८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेली उपलब्ध झाली आहेत, त्यांवरून त्या काळच्या राजधर्माची चांगली कल्पना येऊ शकते. ती कर्तव्ये आजच्या मितीसहि उत्कृष्ट आदर्श म्हणून पुढे टेवण्यासारखी आहेत. ती अशी:- If the king does not give heed to justice, his people shall be Goverthrown and his land shall be brought into confusion. If hegives no need to the law of his land, Eathe King of des- tinies shall change his destiny and shall visit him with misfortune. If he gives no heed to his nobles, his days thall not last leng. If he gives no hoed to the wise mem, his land shall revolt against him. If hegives heed to wisdom, the kingshall behold the strength- ening of the land. _f hegives heod to the commands of Fa, the great Gcds shail endow him with true knowledge and discernment. भाषांतर:-जर राजा आपल्या प्रजेला योग्य न्याय देणार नाही, तर त्याच्या प्रजेचा नाश होईल व सर्व राज्यभर गोंधळ व अंदाधुंदी माजून राहील. आपल्या राज्यांतील कायद्यांना जर राजा मान देणार नाही, तर सत्याचा देव वरुण त्याच्यावर दुर्दैवाची वक्रदृष्टि करील व त्यामुळे त्याच्यावर मोठा अनर्थ गुजरेल. जर राजा आपल्या राज्यांतील सरदारांकडे दुर्लक्ष करील, तर त्याचे दिवस भरले, म्हणून समजावे. जर राजा आपल्या देशांतील प्रबुद्ध लोकांचा सल्ला ऐकणार नाही, तर त्याचेच प्रजाजन त्याच्याविरुद्ध बंड करतील. याच्या उलट-जर राजा सदुपदेश ऐकेल, तर मात्र तो आपल्या राज्याला बळकटी आणील. आणि त्याचप्रमाणे जर राजा वरुण देवाच्या आज्ञांचे पालन करील, तर सर्व देव त्याला ज्ञान व विवेक यांचा लाभ देतील. खासगी, कौटुंबिक व सामाजिक व्यवहारांत नीतिअनीतीची काय कल्पना होती, याविषयी एक प्रश्नमालिका सांपडली आहे, ती मोठी मजेदार आहे. कालि- दासाच्या रघुवंशांत ज्याप्रमाणे क्वचित् शब्दाने आरंभलेल्या प्रश्नांच्या रूपाने ऋषींनी रघुराजाची उलटतपासणी केली आहे, अथवा महाभारतांतहि अशाच क्वचित्प्रश्नांनी तत्कालीन अपकृत्यांची यादी नमूद करून ठेविली आहे, तशाच प्रकारची ही सुमेरि. यन वाङ्मयातील प्रश्नमालिका आहे, ती भाषांतररूपाने येथे देऊ. " त्याने बापलेकांची ताटातूट केली आहे काय ? मायलेकींची ताडातोड त्याने केली आहे काय ? सासू-सुनेमध्ये त्याने वितुष्ट पाडले आहे काय ? भावाभावांत, मित्रामित्रांत, व स्नेह्यासोबत्यांत बिब्बा घातला आहे काय ? बंदिवानाला बंधमुक्त