पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अन्नासाठी तळमळत अथवा एकट्या माणसाला झपाटण्यासाठी भटकत फिरतात, असें त्यांचे वर्णन केलेले आहे. राक्षस कधी कधी मनुष्याचे अथवा दुसऱ्या एखाद्या प्राण्याचे मनमोहन रूप धारण करतात, असेंहि वर्णन आहे. सुमेरिआंत लिलु या नावाची एक राक्षसीण सुंदर रूप धारण करून पुरुषांना भुलवून मारीत असे, असें वर्णन आहे. तिच्यावरून शप- नखेचे स्मरण होते. मारीचाने सुवर्णमृगाचे रूप धारण करण्याचा प्रकार याचपैकींचा आहे, सुमेरियांतील दुसरी एक राक्षसीण लावतु सुंदर मानवस्त्रीरूप धारण करून लहान मुलांना ठार मारीत असे, अशी कथा आहे.. आपल्याकडेहि ताटका आहेच. घुबडाला सुमेरियांत फार अशुभ मानीतः- When the owl raised its •malancholy Toice, ihe linster heard the spirit of a departed mother errying for its child.' (घुबडाच्या घूत्काराचा अर्थ असा समजला जात असे की, मेलेल्या, आईचा आपल्या मुलासाठी चाललेला तो आक्रोश आहे.) परंतु पिशाचामध्ये सर्वांत भयंकर पिशाच्च मेलेल्या बाळंतिणीचे आहे, असें सुमेरियांत मानले जाई. किंग म्हणतोः- The most terribloghost was that of a woman who died in child- bed. Her impurity clung to her like poison. No spirit was moro prone to work evil against mankind and her hostility was accompa- nied by the most tragic sorrow.' ( मेलेल्या बाळंतिणींची भुते फार भयंकर मानली जात. ती नेहमी मनुष्यांपैकी कोणाला तरी झपाटण्यासाठी झटत असतात, व अशा झपाटलेल्या माणसांच्या दुःखाला पार नाही असें मानीत.) मनुष्याच्या मृत्यूनंतरच्या अंत्यविधीची माहितीहि सुमेरी थडगी उकरल्यावर मिळाली आहे. Pro-historic Sumerian graves disclose the bodies laid on their sides, with a drinking cup-urn beside the right hand.' थडग्यांत प्रेत एका कुशीवर ठेवात, व त्याच्या उजव्या हाताजवळ पाणी पिण्या- साठी एक पेला ठेवीत. मृत्यूनंतर पापी प्राणी नरकात जात व पुण्यवान् स्वर्गात जात. नरकाचे वर्णन मागे आले आहे. त्याच्याच पुढल्या भागांत मृत्यूनंतरच्या स्थितीविषयी म्हटले आहे की:- The house from which none who enter come forth again, To the road whose course returneth not. जेथे गेलेला प्राणी कधीच परत येत नाही. त्या रस्त्याने गेलेल्याला पुनरा- वर्तन नाही. ( येथे हॅम्लेट नाटकांतील शेक्सपिअरने हॅम्लेटच्या स्वगत भाषणांत त्याच्या .