पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/८५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८१) तुफान आणीत, नेरगाल या यमाचे दूत पृथ्वीवर येऊन दुष्काळ, रोगोद्रेक, जल- प्रलय इत्यादि रूपांनी धुमाकूळ माजवीत. आपल्याइकडेहि इंद्राचे मित्र मरुत्, शिवाचे गण, यमाचे दूत हेच कार्य करतात, तैमात वगैरे प्रत्यक्ष सर्परूप राक्षसांचे वर्णन मागें आलेच आहे. दक्षिणवायु हा एक झंझावात-रूपी राक्षस होता, असे मानले जात असे व त्याचा एक पुतळा केलेला होता, त्यावरून त्याची कल्पना येण्यासाठी त्याचे चित्र पुढे देत आहे आहे. शा दक्षिणवायुनामक झंझावातरूपी काल्पनिक सुमेरी राक्षसाचे चित्र, मेलेल्या पापी माणसांची पिशाच्चे भटकत असत असे वर्णन आहे. Chosts Vendered through the steet in darkness; they haunted empty honses; they fluttered through the evening air at bats they hastenod, moaning dismally across barren wastes, Fearehing for food or lay in wait for travellers as siezers.' 'पिशाचे रात्रीच्या घोर अंधकारातून भटकतात, ओसाड घरांत वस्ती कर- तात, वडवाघुळाच्या रूपाने रात्री फिरतात, भयंकर रीतीने रडतात, रुक्ष प्रदेशांतून