पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/८३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७९) याशिवाय एका देवाचें वर्णन अर्थसाम्याच्या दृष्टीने मनोरंजक वाटण्यासारखें आहे. तो देव झ्यु हा गुरुडपक्षी होय, तें वर्णन असें:-एटाना नांवाचा एक राजा होता. त्याची बायको गरोदर झाली. परंतु, मुलाचा जन्म कांहींकेल्या होईना. तेव्हां त्यासाठी 'अमृतवल्ली' आणावयास पाहिजे होती. ती आणण्याचे काम झ्यु. या गरुडपक्ष्याशिवाय दुसऱ्या कोणाच्यानेहि होण्यासारखे नव्हते. झ्यूची व एटनाची मंत्री असल्यामुळे त्याने ते काम करून दिले. परंतु ते करितांना त्याने. सपाच्या मातेने आपली पिलं ठेविली होती, तेथे जाऊन त्यांना त्रास दिला; कारण त्यापूर्वी तिने झ्यूला दुखविले होते. तथापि त्या वेळी याहून आधिक प्रसंग काही घडला नाही.. इयूने 'अमृतवल्ली' आणल्यावर एटानाच्या पत्नीची प्रसूति होऊन तिला मुलगा झाला व तो सुखरूप राहिला. त्यानंतर एकदां एटानाच्या मनांत स्वगात जावें असें आले तेव्हां तो झ्यूच्या पंखांना लोंबकळून राहिला व इयूने उडून स्वर्गारोहण केलें. स्वर्गद्वाराशी प्रवेश करितांच तेथील तेजःप्रकाशानें एटाना भयभीत झाला व देवांच्या सिंहासनापाशीं तो दंडवत् पडला, तथापि त्याला झ्यूने सावध करून त्याहून उंच चलण्यास अधिक उत्तेजित केले. त्याप्रमाणे तो झ्यूला धरून आकाशात उडू लागला, वर जातां जातां त्याला पृथ्वी जोराने खाली खाली जात आहे व लहान लहान होत आहे. असे भासू लागले. जणूं काय पृथ्वी वरून खालींच फेकली जात आहे. स्वर्गारोह- णाच्या वेळचे हे रम्यकल्पनात्मक वर्णन वाचणाराला, असेंच सुंदर पण याच्या उलट वर्णन कालिदासाने आपल्या शाकुंतल नाटकाच्या सातव्या अंकांत स्वर्गावतरण करणाऱ्या दुष्यन्ताच्या तोंडी घातले आहे, त्याचे स्मरण झाल्यावांचून राहणार नाहीं, दुष्यंत वर्णन करितो की:- शैलानामवरोहतीव शिखरादुन्मजतां मेदिनी। पर्णाभ्यन्तरलीनतां विजहति स्कन्धोदयात्पादपाः॥ संतानैस्तनुभावनष्टसलिला व्याक्तं भजन्त्यापगाः। केनाप्युत्क्षिपतेव पश्य भुवनं मत्पार्श्वमानीयते ॥१॥ त्यानंतर त्यांना अनु. बेल वगरे देवांचे लोक दिसू लागले. तथापि तेवयाने एटानाची महत्त्वाकांक्षा तृप्त न झाल्याने त्याहि लोकांच्या वर असलेल्या इश्तर देवींच्या लोकापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्याने झ्यूची प्रार्थना केली. परंतु आणखी काही अंतरापर्यंत गेल्यावर मग त्याच्यावर मात्र झ्यूच्याने जाववेना; तेव्हां झ्य व एटाना असे दोघेहि एकदम खाली पडले त्यानंतर एका प्रसंगी पूर्वीच वैर साध. ण्यासाठी सपोचा नाश करण्याचे हेतूनें. झ्यू निघाला. सुमेरी पुराणांत याबद्दलच वर्णन असे दिले आहे:- His hoart. prompted the Eagle. .He considered and his heart wished To eat the young of the serpent. The Dagle opened his mouth and spake unto his young Saying, the young of the sarpent, I will eat. I will ascend and mouth up into Heaven; I will swoopdown upon the top of a tree and I will eat the brood. प्रसंगी पूर्वीचे वैरी पाचा नाश करण्याचे हेत. या