पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/८२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७८) यावरून उघड होते की, सुमेरी व हिंदी या उभय संस्कृतीत असलेल्या कल्पनाच सुमेरी लेखांवरून पुढे परंपरेने युरोपांत गेल्या आहेत, ____ वरील मुख्य मुख्य देवांच्या वर्णनानंतर देवीच्या वर्णनाकडे वळतां असे दिसते की, आद्य सुमेरी कालांत आपल्या इकडील वैदिककालाप्रमाणेच स्त्रीदेवतांना फारसें महत्त्व नसे. वेदांत सृष्टिविषयक कल्पना म्हणून फक्त उषचे वर्णन आहे. त्याचप्रमाणे सुमेरियांतहि स्थिति असे. किंग म्हणतो:- - The Goddesses, with one exception, are not very imposing figures nor are their characters very sharply defined or differentiated. . श्री देवतांना-एक इइतर देवतेखेरीज करून फारसें महत्वहि नसे, व त्यांच्या गुणधर्मात स्पष्ट असा फरक केलेलाहि आढळत नाही. इतर देवतेला मात्र फार महत्त्व दिलेले आहे. त्या काळचें, इदतर देवतेची एक स्त्री पूजा करीत असल्याचें एक कोरलेले चित्र उपलब्ध झाले आहे, ते येथे देत आहे. इश्तर देवीचे चित्र. या चित्रांत सुमेरी देवी इश्तरच्या हातांत धनुष्यबाण असून तिने मुकुट घातला आहे. तिच्या पायाखाली सिंह आहे. तिच्या पाठीवरून उजव्या खांद्यावर आलेला बाणांचा भाता आहे. मागे झाड आहे. तिच्या पुढे एक स्त्री पूजनासाठी उभी आहे. इश्तर हिचे हे ध्यान युद्धद्यमान आहे, तथापि सुमेरी वाङ्मयांत ती शांत व वरदा- यिनी अशाहि दाखविली आहे. यावरून आपल्याइकडील दुर्गप्रमाणे तिची कल्पना __ असावी असे वाटते. आपल्याकडील इंद्राणीप्रमाणे तिकडील मईकची स्त्री सनिता इला फारसे महत्त्व नसे. त्याचप्रमाणे शम्सु (सूर्य) ची बायको ऐ, सिन् (चंद्र) ची बायको निंगाल, रम्मान् (गुरु ) ची बायको शाला, नेरगाल ( यम ) ची बायको लाज, व इआ ( वरुण ) ची बायको डकिना, यांना फारशी प्रतिष्ठा दिलेली नाही.