पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/८०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७६) सुमेरियांतहि आपल्याप्रमाणे अशी समजूत असे की. पुण्यवान् मानव स्वर्गस्थ झाल्यावर ते तारकारूपानें राहतात. ध्रुवाची गोष्ट आपल्याकडे प्रसिद्धच आहे. सप्तर्षि व वसिष्टपत्नी अरुंधती अजूनहि आकाशांत सप्तर्षि-तारारूपानें अमर राहिल्याची आपली समजूत आहे. सुमेरियांतहि इतरचे शुभतायाशी याच प्रक्रियेने एकीकरण झालेले आहे. र याप्रमाणे ज्योतिषविषयक माहितीबद्दल विवेचन केल्यानंतर आतां आपण देवत्व विषयक वर्णनाकडे वळू. या मालेतील दुसऱ्या लेखांकांत वरुणाचे वेल था देवतेशी- असलेले साम्ब वर्णन केलेच आहे. तथापि वेल हे नांव बॅबिलोनिअन आहे त्या देवतेचे खरे सुमेरी नांव इआ आहे. आपल्याइकडील वरुण हा जलदेवता असून, तो जलांत राहतो. त्याच्या आज्ञेनेंच नद्या पाण्याने भरून वाहू लागतात (ऋ. २-२८-४.). मीन व वरुण हेच नद्यांचे अधिपति होत. (ऋ.६-६४-२), वरुण हा जलांतून माँगक्रमण करितो (ऋ. १-१६१-१४), वरुण हा सिंधूमध्ये उतरतो (ना. ७-८७-६), मनुष्याचें सत्यासत्य आचरण अवलोकन करीत तो मधूर व स्वच्छ अशा जलांमधून फिरतो (न. ७-४९-३), तो जलांचे वस्त्र अंगावर घेतो (ऋ. ९-९०-२) त्याचे सुवर्णगृह जलांमध्ये आहे (ऋ. ७-८३-१), इत्यादि अनेक सूत्तांतून त्याचे जलस्वामित्व वर्णिलेले आहे. सुमेरी वाङ्मयांतहि इआ हा 'King of the watery Deep' आहे असे म्हटले आहे. विशेषतः प्रो. जैस्टो याने म्हटल्या- प्रमाणे This reference is not to the salt occan but the Tweet waters which feed the streams andjyrigate the fields." ( हा जलाचा संबंध समुद्राच्या खाया पाण्याचा दर्शक नसून वाह- णाच्या व शेते पिकविणाऱ्या मधुर जलांचा दर्शक आहे.) या दृष्टीने वरुण हा मधुर व स्वच्छ जलांत फिरतो, असा जो वर वैदिक संदर्भ दिला आहे, तो मननीय साडे मॅकमी म्हणतो:-As the country was fertilized by the rivers. Ea, the fish god was a fertilizing diety.' 'त्या प्रदेशांतील पिके नदीच्या पाण्यावर होत असल्याने, इआ हा शेतें पिकविणारा मत्स्य देवतादर्शक आहे,' हा उल्लेखहि वरील तत्समान वैदिक वरुणाच्या उल्लेखाशी अगदी समानार्थक असल्याचे दिसून येईल. 'Ea knoweth everything' (इआ सर्वज्ञ आहे): He was lord of the world, lord of what is beneath, lord of heaven and earth. वगैरे वर्णने बरोबर वरुणाच्या वर्णनाशी समानार्थक आहेत. यानंतर सूर्यदेवतेचा विचार करूं. त्याचे वर्णन मुमेरी लिखाणावरून असे केले आहे:- He was agod of Destiny, the lord of the living and the dead was exalted as the great judge, the law giver, who uphold justice; he was the enomy of wrong,he loved righteousness, and hated sin;he inspired his worshippers with the rectitude and punished evil-doers he illuminated all the world and his rays penetrated every quarter%3 hesawall things, he read the thoughts of all men, nothing could; be concealed from Shamsh.