पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७५) ___ अमी ये पंचोक्षणो मध्ये तस्थुः महो दिवः। हे महाप्रबल पांच देव विस्तीर्ण अशा लोकांच्या मध्यभागी असतात. असे त्यांत म्हटले आहे. त्यानंतरच्या अथर्वज्योतिषांत त्यांचा सप्तग्रह म्हणून स्पष्ट उल्लेख असा केला आहे:- आदित्यः सोमोभौमश्च तथा बुधबृहस्पती । भार्गवःशनैश्चरश्चैव एते सत दिनाधिपाः ।।९३. आदावेदकालापासून निस्तोत्तर पांचव्या शतकांतील वराहमिहिरापर्यंत सातच ग्रह मानीत असत. त्यानंतर राहुकेतु कुंडलीत मांडण्याची चाल सुरू झाली. वराह- मिहिराने सुमेरी ज्योतिषांप्रमाणेच ग्रहांचें शुभाशुभत्व मानले होते. त्याच्याहि मतें गुरु व शक शुभ शनि व मंगळ पाप आणि बुध हा 'बुधस्तयुतः ।' म्हणजे ज्याच्याशी युत असेल तसा, असेंच वर्णन केले आहे. निरनिराळ्या ग्रहांचे रंगहि सुमेरी ज्योतिषांत ठरविले होते. ते असे:- सूर्य-सोनेरी, चंद्र-रुपेरी, मंगळ-लाल, बुध-निळा, गुरु-नारिंगी, शुक- पीत, शनि-कृष्ण. आपल्याकडील ग्रहांचे रंग वृहज्जातकाच्या खालील लोकांत वर्णिले आहेत रक्तश्यामो भास्करो गौर इंदुः । नात्युच्चांगो रक्तगौरश्च वक्रः ॥ दर्वाश्यामो ज्ञो गुरुौरगावः । श्यामः शुक्रो भास्करिः कृष्ण देहः ॥१॥ अर्थः-सूर्याचा वर्ण गहिरा तांबडा, चंद्राचा गौर, मंगळाचा रक्तगौर, बुधाचा दूवेच्या रंगाचा हिरवट काळा, गुरूचा गोरा, शुक्राचा तेजस्वी या (निळसर ) व शनीचा कुळकुळीत काळा. समरियांत ग्रहणांची भविष्योहि वर्तविली जात असत. बॅबिलोनियांतील निसर शहरांतील वेधशालेतून घेतलेले वेध व त्यांची फळे त्या काळी राजाकडे पत्रदा पाठविली जात. अशा पत्रांपकी एक पत्र विटांवर कोरलेल अस्सल उपलब्ध झालें आहे. त्यांतील मजकुराचें शब्दशः इंग्रजी भाषांतर प्रो. हार्पर याने प्रसिद्ध केलें आहे. ते येणेप्रमाणे:- As for the eclipse of the Moon about which, the king. my lord. has written to me, awatch was kept for it in the cities of Akad' Borsippa and Nippur. We observed it ourselves in the city of Akhnd. And whereas, the king,my lord, ordered me to observe alsotha eclipse of the Sun, I watched to see wheather it took place or not.and what passed before my eyes. I now report to the king, my lord. It was an eclipse of the Moon that took place. अर्थ:-" महाराजांनी आम्हांस चंद्रग्रहणाचा वेध घेऊन त्याबद्दल निवेदन करण्याची आज्ञा केल्यावरून कळविण्याचे की, स्वामींच्या आज्ञेप्रमाणे अक्वड, बोर. सिप्पा व निप्पूर या तिन्ही वेधशालांमध्ये वेध घेण्याची व्यवस्था करण्यांत आली होती आम्ही स्वतः अक्कड येथील वेधशाळेतून निरीक्षण करत होतो. या उपरी मा राजांनी सये ग्रहणाचेहि वेधण्याचें फमोविल्यावरून तं ग्रहण लागले किंवा नाही याचे आम्ही निरीक्षणा केले. त्यावरून आमच्या नेत्रांना जे दिसले ते कळविण्या की, ( सूर्यग्रहण लागले नसून) चंद्राचे खग्रास ग्रहण मात्र लागले होते ,