पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७०) पशु यांचा लाभ होईल. जो जो आशीर्वाद तुला हवा असेल, तो तो तुला माझ्या- पासून प्राप्त होईल.) 1. तयार्चन छाम्यंश्चकार प्रजाकामः । तया इमां प्रज्ञां अतिप्रजझे येयं मनोः प्रजेति । याम्वेनया कांच आशिषमाशास्ते साऽस्मै सर्वा समायंत । (त्याप्रमाणे मनूने तिच्यासहवर्तमान अर्चन, व तप केले. तिच्यापासून (तिच्या साह्याने ) सांप्रतची प्रजा त्याने निर्माण केली व म्हणून तिला मानव- ( मनूची) प्रजा असे म्हणतात. त्याने जे जे आशीर्वाद मागितले. ते ते सर्व तिच्या साह्याने त्याला संप्राप्त झाले. ) 2 अशा प्रकारची ही जलप्रलयाची हिंदी कथा वेदांतील ब्राह्मणभागांत अनुस्यूत केली आहे. हिच्यांत व सुमेरी कथेत साधयेवैधर्म्य पहातां, सुमेरी कथेतील पीर- नापिरितमूला महापुराची अगाऊ सूचना देणा-या इआ देवाच्याऐवजी भारती कथेत ने कार्य मत्स्याने केलेले दाखविले आहे, व शेवटी उत्पन्न झालेल्या स्त्रीस सुमेरी कथेत पीर नापिदितमची पत्नी म्हटले आहे, त्याच्याऐवजी भारती कथेत ती स्वतः मनूला आपण त्याची दुहिता असल्याचे सांगत आहे. एवढाच काय तो फरक आहे. या वैधयाखेरीज बाकीचे सर्वच साम्य आहे व ते इतकें आश्चर्यकारक आहे की, एक- बंशोद्धलाशिवाय त्याची समाधानकारक उपपत्ति लागणे शक्यच नाही! फार काय, वरील जलप्रलयाच्या कथेतहि जो एक फरक म्हणून वर नमूद केला आहे. तो सुद्धा वस्ततः फरक नाहीं. पीर-नापिहितम्ला महापुराची अगाऊ कल्पना इआ देवाने दिली व मनूला मत्स्याने दिली, असा बाह्यतः फरक दिसतो; पण हा इआ देवहि मुळांत मत्स्यावतारच होता. मॅकेंझी हा ग्रंथकार म्हणतो:-" Originally Ea. appear's to have been a fish--the incarnation of the spir- it of or life-principle in the Euphrates river"मळांत इआ हाहि मासाच होता-युफ्रेटिस् नदाचें प्राणस्वरूपच त्याच्या नांवानें वर्णिले आहे." कारण सुमेरी वाङ्मयांत युफोटिस नदीतच इआचें वास्तब्य णिलें आहे. ते असें:- Oh thon river, who didst create all things, When the great Gods dug thce out, They set prosperity upon thy banks, Within thee Ea, the king of the Deep, created his dwelling. जलप्रलयासारख्या सृष्टिनाशदर्शक व त्यापुढील मृष्ट्युत्पत्तिदर्शकं कथा या त्या त्या देशांतील समाजाच्या आधारभूत मूळ कल्पना असतात; अर्थात् त्यांच्यांतील साम्य, म्हणजे स्थलदर्शक व वंशदर्शक एकत्वाचा निःसंदिग्ध पुरावा होय. या जलप्रलयकथेच्या साम्यानंतर वर्णन करण्यासारखें साम्य म्हटले म्हणजे हिंदी व सुमेरी या दोन्ही संस्कृतीतील युगांच्या कल्पनेतील होय. आपल्याइकडील लोकांना ही युगकल्पना अगदी नित्य परिचयाची असल्याने सहज ध्यानात येण्यासारखी आहे.