व सुमेरिआंतील कथेत जितकें संपूर्ण साम्य आहे, तितकें सुनेरी व इतर कथांत नाही.
कारण हिंदी व सुमेरी लोकांचे पूर्वज एकच असून त्यांचेच दोन भाग हे होत. त्यामुळे
त्या दोघांत असलेल्या मूळ कथाभागांत एकरूपता सहजच राहिली. त्यासाठी आतां
त्या प्रलयाची हिंदी कथा आपण अवलोकन करूं. ती कथा शतपथबाह्मणाच्या
आठव्या अध्यायाच्या पहिल्या ब्राह्मणांत दिली आहे. ती मूळ संस्कृतासह भाषांतर-
रूपाने खाली देत आहे:-
१ मनवे ह वै प्रातः अनवेज्यमुदकमाजहु यर्थेदं पाणिभ्यामवनेजमाया हरन्ति
एवं तस्यावनेनिजानस्य मत्स्यः पाणोऽआपेदे।
( एके दिवशी प्रातःकाळी- ज्याप्रमाणे हदीहि ( हस्तादि) मार्जनासाठी
पाणी आणतात त्याप्रमाणे-मनूसाठी मार्जनाकरितां पाणी आणले. त्या पाण्याने तो
नार्जन करीत असतां, त्याच्या हातांत एक मासा आला.)
२सहास्मै वाचमुवाद । विभृहि मां पारयिष्यामि त्वा इति । कस्मात् मा पार-
यिष्यसि इति । ओघे इमा प्रजाः सर्वाः निवोटा अतस्त्वा पारयिताऽस्माति । कथं ते
भृतिरिति ।
( तो मासा म्हणाला:-' माझें तूं पालन कर, मी तुझें रक्षण करीन.' मनूने
म्हटले. 'तूं कशापासून माझें रक्षण करिशील?' तेव्हां तो मासा म्हणाला 'महा-
पूर येऊन त्यांत सर्व जग बाहुन जाणार आहे. त्यांतून मी तुझें रक्षण करीन.'
त्यावर मनु म्हणालाः-'तुझें रक्षण मी कसे करूं?'.)
३ स होवाच यावद्वै क्षुटका भवामो बह्वी वे नः तावन्नाश भवति । उत-
मत्स्त्र एवं मत्स्यं गिलति। कुंभ्यामाग्रे बिभरासि । स यदा तामतिवर्धाऽथ करें
खात्वा तस्यां मां बिभरासि स यदा तामतिवर्धा अथ मा समुद्रमभ्यवहासि । तहि
वाऽति नाष्ट्रो भवितास्मीति।
(तो मत्स्य म्हणाला:-'जेथपर्यंत आम्ही क्षुल्लक (लहान) असतो, तेथ-
पर्यंत आम्हांला फार भीति असते; कारण मासाच माशाला गिळतो ! यासाठी प्रथम
तूं मला एका कुंभांत ठेव. तेथे मी ( त्यांत न मावण्यासारखा ) मोठा होतांच. त्यांतून
काढून एक खाडा खणून त्यांत मला ठेव. तेथे मी अधिक मोठा झाल्यावर त्यांतून
काढून मला समुद्रात टाक. कारण मग माझा नाश होणे शक्य नाही.)
४ शश्वद्ध झष आस । स हि ज्येष्ठं वर्तते । अथ इतिथीं समां त दोघ आगन्ता
तन्मा नावमुपकल्प्योपासासे सऽओघऽउत्थिते नावमापद्यास ततस्त्वा पारयितास्मीति ।
(नंतर तो मासा मोठा मत्स्य झाला. कारण माशाची वाढ फार असते. मग
तो मनूला म्हणालाः-अमुक अमुक वर्षी महाप्रलय होणार आहे. त्यावेळी मी
तुला सांगतो, त्याप्रमाणे तूं कर तूं एक नाव बांध व जेन्हां महापूर येईल, तेव्हां
तूं त्यांत जाऊन बस. मग मी तुझे रक्षण करीन.)
५ तमेवं मृत्वा समुद्रमभ्यवजहार । स यतिथीं समां परिदिदेश ततिथी समां
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/७२
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
