पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Abandon thy goods save thy life." As for the ship, which thou shalt build, Well-planned must be its dimensions, Its breadth and its length shall bear pproportion each to each, And thon shalt launch it in the ocean. अर्थः-गिलगमेशा मी तुला तें परम रहस्य, तो देवांचा संकल्प आतां तुला सांगतो ऐक.... ... "एके काळी देवांचा बेत पृथ्वीवर महाप्रलय करण्याचा ठरला. त्याप्रसंगी देवांच्या सभेत देवाधिदेव अनु, सेनापति बेल व इयादेव वगैरे सर्वजण बसले होते. त्यानंतर हा देवांचा संकल्प इआने येऊन मला सांगितला. तो म्हणाला, उबारा-तुतूच्या पुत्रा. हे पीर-नाशिस्तिम्, तूं आतां आपले घर पाडून टाक, व त्याच्याऐवजी एक नाव बांध, तूं आपल्या सर्व मिळकतीचा त्याग कर, व फक्त आपल्या प्राणांचा संभाळ कर- ण्याच्या तयारीला लाग. तूं जी नाव बांधशील, तिची लांबी व रुंदी यांचे योग्य प्रमाण ठेव. व ती प्रशस्त असू दे व मग ती तूं समुद्रांत ढकल.' ... पीर-नापिरितम् पुढें गिलगमेशला सांगतोः- Bina The command, oh my Lord, which thou hast given • I will honour, and will fulfil. 'मी इआला सांगितले की, देवा, तुमची आज्ञा मी अक्षरशः पाळान व त्याप्रमाणे वर्तन करीन... ___पुढे इआने पीर-नापिदितम्ला आणखी सांगितले की, हा जलप्रलय अमुक दिवशी ठरलेल्या वेळी येईल. त्या काळाची तूं वाट पहात रहा. व ठरलेल्या वेळी आपल्याबरोबर आपले सामान, व अन्नवस्त्र घेऊन त्यांत जाऊन बस. त्याप्रमाणे पीर- नापिरितमूने लाकडे गोळा केली व सतत चार दिवस मेहनत करून ती नाव पांचव्या दिवशी तयार केली. नंतर तीत सामान भरण्यांत आणखी दोन तीन दिवस घालवि- ल्यावर सातव्या दिवशी त्याची सर्व तयारी इआने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण झाली • A fixed Time Shamsh had appointed, saying: The lord of darkness will at even tide send a heavy rain, Then go into the ship and shut thy door. The appointed season arrived and the ruler of the darkness Sent at eres tide a heavy rain. Of the storm I saw the beginning, To look upon the storm I was afraid, I entered the ship and shut the door. पुढे पीर-नापिरितम् सांगतोः-'शम्स् देवाने प्रलयाचा नक्की काल ठरविला होता व मला सांगितले होते की, तूं ( पीर-नापिरितम् ) नावेंत जाऊन बस व तिचें दार लावून घे. त्याप्रमाणे नक्की केलेला दिवस आला. त्यावेळी प्रलयदेवतांनी अति- वृष्टीला सुरवात केली. त्याच्याबरोबर झंझावातहि सुटला व त्यामुळे इतकें प्रचंड