पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

I behold thce oh Pir-Navis thin; Rut thy appearance is not changed, Aslam, so art thou also. How didst thou obtain the life which thou dost enjoy In the assembly of the gods and the immortals? .. जसा मी देहधारी तसेच आपण दिसतां. आपल्यांत काही फरक दिसत नाही: तेव्हां देवांच्या व अमरांच्या सहवासांत राहण्यासारखी ही संजीवनी आपल्याला कशी प्राप्त झाली? यावर उत्तरादाखल पीर-नापिरितम्ने गिलगमेशला महाजलप्रलय याची कथा सांगितली. ती कथा यापुढील लेखांकांत देण्यात येईल. ती सांगितल्यावर पीर-नापिरितम् गिलगमेशला म्हणाला, मृत्यू चुकविण्याचा मार्ग तर मी तुला दाखवू शकणार नाहींच: पण तुला संपूर्ण आरोग्य मात्र मी देऊ शकतो. यासाठी प्रथमतः तूं सहा दिवस व सहा रात्र रात्री स्वस्थ झोप घे. त्यान- माणे तो निजल्यावर पार-नापिरितमने आपल्या बायकोला एक अभिमंत्रित अन्नाचा चरु तयार करण्यास सांगितले. त्यावरून सात मंत्रांनी अभिमंत्रण करून तिने तो तयार केला.व गिलगमेंश झोपेत असतांच त्याला तो खाऊ घातला. त्यानंतर गिल- गमेश जागा झाला, तो त्याचा सर्व रोग नाहीसा झाला. मग परि-नापिरितमुने आराद-इआला आज्ञा केली की 'तूं गिल्गमेशला घेऊन एका पवित्र उदकाच्या झऱ्यावर जा व त्याच्या जलानें गिलगमेशचे सर्व शरीर धुवून काढ, त्याप्रमाणे करतांच त्या सर्व शरीर उत्कृष्ट कांतिमान् वनले. तेव्हां गिल्गमेश हा आपल्या पितरांचा निरोप घेऊन परत जाण्यास निघाला. जाण्यापूर्वी पीर-नापिरितमने गिलगमेशला एक बनस्पती दाखविली व तिच्या सेवनाने अखंड यौवन-प्राप्ति होते असे सांगितले परंतु ती बनस्पती घेऊन आराद-इआ व तो परत जात असतां. वाटेत एका सके ती पळविली ! तेव्हां गिल्गमेशला फार खेद झाला व तो तसाच पुढे निघाला.. जाता जातां त्याला आपला मृत मित्र इआ-बनी याचे स्मरण होऊन फार दुःख झाले, व त्याने यमधर्माची प्रार्थना केली की कसहि करून मला एकदा माझ्या मित्राची भेट करव. त्या प्रार्थनेने संतुष्ट होऊन यमधर्म नेरगाल याने मृत्यु लोकाचा दरवाजा उघडला. व त्यांतून इआ-बनी हा आपल्या मृत्युलोकाच्या शरीराकृतीने बाहेर आला. तेव्हां गिलगमेशला फार आनंद झाला व त्याने त्याला यमलोकांतील हकीकत विचारिली. त्यावर इआ-बनी म्हणाला मित्रा ती तुला सांगता येत नाहीं. कारण तेथील यातना तूं ऐकल्यास तर तुझ्या हृदयाचे पाणीच होऊन जाईल, इतक्या त्या भयंकर आहेत. तथापि गिलगमेशने फार आग्रह केल्यावरून इआ-बनीने यम- लोकाचे वर्णन केलें. तो म्हणाला-तेथे पापी लोकांना धुळीत लोळावे लागते, तेथे खांना कृमिकीटक तोड्न खातात पण रणांत मारलेला योद्धा हा-