पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/६०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मागून घट्ट पकडून ठेविली, ब पुदन गिलगमेशने आपल्या तरवारीने त्याचे मस्तक उडविलें. याप्रमाणे गिलगमेशच्या नाशासाठी इइतर या देवीने खास निर्माण केलेल्या बैलाचा उलट त्यानेच नाश केल्याने इतरचा क्रोध अगदी अनाचार झाला. इकड गिलामेशने त्या मारलेल्या बेलाची शिंगे आणून शम्सु या आपल्या र सर्य देवतेला अर्पण केली. नंतर मोठ्या समारंभाने त्याने आपल्या राजधानीत प्रवेश केला व आपल्याला मिळालेल्या यशाच्या द्योतनार्थ त्याने एक आपल्या मित्रांना मोठी मेजवानी दिली. परंतु अत्यंत क्रुद्ध झालेल्या इतरने आपल्या देवी प्रभावाचे सामर्थ्य एकवटून इआ-बनींचा मृत्यू घडवून आणला. तो असा की, एका लढाईत त्याला एक मोठी जखम झाली व तिने तो बारा दिवस आजारी झाला. तेव्हां त्याने गिल्गमेशला बोलावून सर्व हकीगत सांगितली, व मग त्याचा निरोप घेऊन आपला प्राण सोडला. त्या आपल्या अत्यंत प्रिय मित्राच्या मृत्यूनें गिल्गमेश यारा फार -मोठा धक्का बसला व दिवसेंदिवस तो स्वतः त्या दुःखाने झर, लागन आजारी पडला. त्यामुळे तर आपली गति आपल्या मित्रासारखाच होते की काय ही त्याला भांति पडली. तेव्हां त्याने असा बेत केला की, आपला प्राचीन पितर पीर नापिरितम् म्हणून आहे, त्याला शोधून काढून त्याच्याकडून आपला मृत्यु चुकविण्याचा उपाय विचारून घ्यावा. असा विचार करून तो निघाला, तो एका पर्वताच्या भयंकर गुहेतून त्याचा रस्ता होता, तीतून जात असतां त्याला तेथे भयंकर सिंह दिसले. तेव्हां त्याने सिन् या चंद्र देवतेची प्रार्थना केली. तेव्हां चंद्राने त्याला त्या सिंहांना चुकवून जाण्याचा एक रस्ता दाखविला: त्या रस्त्यानें तो पुढे चालला. थोडे अंतर जातांच त्याला एक भीतिप्रद बोगदा लागला; त्याच्या तोंडाशी महाकूर वृश्चिक मार्ग अडवून बसले होते. त्यांची विनंति करून त्याने त्यांच्या परवानगीने आपला पुढला मार्ग आक्रमण केला. त्या बोगद्यांतून बाहेर येतांच त्याला एक भयंकर नदी लागली . ल्या नदीच्या कांठी सवितु या देवाचा अंमल होता. त्या नदीचें नांव मृत्युसरिता अथवा वैतरणी असे होते. तिच्यांतून पार होऊन पलीकडे गेल्याशिवाय गिलगमेशला आपला पितर परि-नापिरितम् हा भेटणे शक्य नव्हते. म्हणून गिलामेशनें सबितूची नदीपार करण्याविषयों याचना केली. तेव्हां सवितूने त्याला सांगितलें:- बाबा, हे होणे शक्य नाही. सर्व प्राणिसृष्टींची अखेर या वैतरणी नदीपाशी आहे. येथून पुढे जाणे शक्य नाही. तेव्हां एवढी तुझा विनंति मला मान्य करणे शक्य नाही. तूं इतर हवे ते माग मी देईन. कवि म्हणतो, सवितूने सांगितले:- Gilgamesh, whither hurriest thol The life that thou seekest, thou will not find. When the Gods created man They fixed death for mankind