गो विकर या जर्मन पंडिताच्या मताने गिल्गमेशच्या या परंपरागत कथेतच
योाफार फेरबदल होऊन त्यावरून ग्रीक पौराणिक कथेतील जेसन व सोनेरी लोंक.
रीचा मेंढा' ही गोष्ट बनली आहे. या गोष्टींचा सारांश थोडक्यांत येणेप्रमाणे आहे-
'थेसिली देशांत प्राचीन काळी ईसन नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याला राज्य-
कारभाराचा कंटाळा आल्यामुळे त्याने आपला भाऊ पेलिआसू याला सांगितले की
'माया मलगा जेसन हा मोठा होईपर्यंत तूं हे राज्य संभाळ.' त्याप्रमाणे पेलिअसनें.
राज्यकारभार सुरु केला. पुढे जेसन् मोठा झाल्यावर तो चुलत्याजवळ आपले राज्य
परत मागं लागला. तेव्हां हातचें राज्य घालविण्यास पेलिअस अर्थातच खुषी नव्हता.
पण त्याला उघडपणे तसे ना म्हणता येईना. म्हणून त्याने आपल्या पुतण्यास सांगितले.
की येथून दूर असलेल्या कल्चिस्च्या राज्यांत एका मेंढ्याची सोनेरी लोकर आहे. ती
तूं घेऊन ये म्हणजे तुला तुझ्या बापाचें राज्य मी परत देईन. त्यावरून
जेसन तें कार्य करण्यासाठी निघाला. त्यासाठी त्याने एक आगों नांवाचें जहाज
तयार केले अनेक धाडसाची कृत्ये करून अखेर कल्चिरच्या राज्यांत येऊन
पोहोचला. व त्याने त्या राजाजवळ ती सोनेरी लोकर मागितली. त्या राजाने.
ती एका अटींवर देण्याचे कबूल केले ती अट ही की श्वासोच्छ्वासाबरोबर अग्निज्वाला
नाकांतन बाहेर सोडणाऱ्या बैलांना नांगराला जुंपून त्याने एका शेतांत एका राक्ष-
साच्या दांतांची पेरणी करावी. जेसन्ने ती अट कबूल केली. त्यासाठी तो त्या बैलांपाशा
गेला, तो त्या बैलांच्या नाकपुड्यांतून अग्नीच्या ज्वाळा चालल्या होत्या व त्यामुळे
कालियाच्या विषश्वासाप्रमाणे त्या ज्वालांनी भोंवतालचे सर्व वनस्पती व प्राणी जळन.
कोळ होत होते. तथापि जेसन्ने युक्तीने त्यांची शिंगें पकडून त्यांना नरम केले व
शेताची नांगरणी अटीप्रमाणे केली. तेव्हां कल्बिसूच्या राजाला ती सोनेरी लोकर जेस-
नला देणे भाग पडले. अशा रीतीने त्या बैलांचा पराभव करून जेसनने ती लोंकर
आणून आपल्या चुलत्याला दिली. तेव्हा पेलिअसलाहि जेसन्च्या बापाचे राज्य जेस-
नला परत द्यावे लागले. अशी ग्रीक कथा आहे. यावरून दोन्ही कथा पाहतां गिल.
गमेश व जेसन यांनी महाप्रबळ अशा बैलांचा पराभव करून आपला हेतु साध्य करून
घेतला हा त्यांतला सामान्य भाग आहे. त्यावरून पगो विकर याने समेरी कोना
लाक्षणिक अथवा रूपकात्मक अर्थ करून सोनरी लाकर म्हणजे वसंतसंपात व ती
बैलांच्या तडाक्यांतन सोडवुन आणली म्हणजे वृषभराशीतून वसंतसंपात कर
असल्याचा संक्रमण काळ होय, असा निष्कर्ष काढला आहे. पाऊण कृत्तिका रोहिणी
व मृगार्ध मिळन वृषभ राशि होतो. अर्थात् या रूपकावरून मृगनक्षत्री वसंतसंपात
असल्याचा काळ होय, व तो म्हणजे नि. पू. चार साडेचार हजार वर्षांचा काळ
होय उघड होते. वेदांचा काळहि हाच होय व तोहि अशाच दुसऱ्या एका रूपकाने
असल्याचे के लो. टिळकांनी आपल्या ग्रंथांतून विशद करून दाखविले आहे.
असो. तेव्हां गिगलमेशने त्या वेलांशी युद्ध केले, त्यांत इआ-बनीने बैलाची शेपर
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/५९
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
