पढे त्याचे ग्रह बदललेले दिसतात. खंबाबाशी युद्ध करून, यश मिळवून परत आल्यावर
गिलगमेशने आपली शस्त्रास्त्रे स्वच्छ केली, आपल्या अंगावरचे कवच काढले, व दरबा-
राला योग्य असा सुंदर पोषाक परिधान केला. अशा या रूपात त्याला पाहिल्याने
इंश्तर ही देवता त्याच्यावर मोहित झाली, व तिने त्याची प्रेमयाचना केली. तिने
त्याला दिव्य उपभोगांची लालूच दाखविली व त्याला सांगितले:--" राजे महाराजे
व देवहि तुला अभिवादन करतील, तुझ्या गाईबैलांची संख्या वाटेल. तुझ्या मेंब्यांना
जळी बची होतील व तुझ्या रथाचे घोडे जलद पळतील." यावरून त्यावेळचा समा-
जहि वेदकालांन समाजाप्रमाणे ' बहुन्पशन हस्तिहिरण्यमश्वान् ' यांना धन समजणारा
होता, हे दिसून येते. तथापि गिल्गमेश हा या प्रलोभनाने फसला नाही. उलट त्याने
इश्तरचीच निर्भत्सना केली. त्यामुळे इतरला क्रोध आला व ती स्वगात आपला पिता
जो अन-देव. त्याच्याकडे गेली व त्याच्या जवळ तिने आपले गान्हाणे सांगितले: गिल
गमेशने केले ते योग्यच केलें, असें अनूला वाटत होते, व म्हणून त्याने तिचे पुष्कळ
शांतवन करण्याचा प्रयत्न केला, पण ती आपला हट्ट सोडीना, तेव्हां अखेर तो
अपत्यस्नेहाला वळी पडला. त्यावरोवर इश्तरनें गिलूगमेशला मारण्यासाठी एक मोठा
थोरला वृषभ निर्माण करण्याबद्दल आपल्या पित्याला विनंति केली, व त्यावरून अनु-
देवाने एक भयंकर वृषभ निर्माण केला. इकडे गिद्गमेशं व त्याचा मित्र इआ-वनी
हे एका देवलोकांतल्या जोडप्याला ( मिथुनाला ) भेटावयास गेले होते. तिकडून परत
येतांना या वृषभाने त्यांना गाठले, त्याबरोबर त्या दोघांचे भयंकर युद्ध झाले. त्याच
दर्शक असे चित्र कोरलेले आहे, ते पुढे दिले आहे.
याच प्रसंगाच्या दुसऱ्या एका पाठांत गिलगमेशवर हल्ला करणारे दोन बैल होते.
असें वर्णिले आहे व त्या पाठाला अनुसरून या चित्रांत त्या दोन बैलांशी गिलामेश
व त्याचा मित्र इआ-बनी युद्ध करीत आहेत, असा देखावा दाखविला आहे. मध्यंतरी
एक मोठा शाल्मली वृक्ष दाखविला आहे, त्यावरून हे युद्ध अरण्यांत झाले असें.
संकेताने दाखविण्याचा चित्रकाराचा हेतु आहे.
याबद्दल आटे मियास गेले है
गिलगमेशचें वृषभाशी युद्ध.
[ या चित्रांत गिलगमेश व त्याचा मित्र इआ-बनी हे दोघेजण, दोन बैलांशी -
लढत असल्याचे दाखविले आहे. 1
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/५८
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
