पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/५७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणू असे आश्वासन दशरथाला त्याच्या पुरोहितांनी दिले. राजाने त्यांना तथास्तु -म्हटल्यावर त्या पुरोहितांनी ठरविले की रूपवान् व अलंकार धारण केलेल्या गणिकांनी अरण्यांत ऋष्यशृंगाकडे जावें, व विविध उपायांनी त्याला लोभवावे. त्यांबरोबर त्या राजाच्या दरबारांतील वारयोषिता चित्रवेश धारण करून गायन करीत व हावभाव करीत त्या अरण्यांत ऋष्यशृंगासमोर येऊन प्राप्त झाल्या. तेथे येऊन त्या त्याला म्हणाल्या. • महाराज आपण अरण्यांत एकटें कोठे येऊन पडला ? नंतर त्यांनी त्याला आलिंगन दिले, व म्हणाल्या 'महाराज, चला, आमच्या आश्रमांत चला.' तेव्हा त्यांचे ते हृदयंगम भाषण ऐकून ऋष्यशृंगाने त्यांच्यावरोवर जाण्याचा निश्चय केला व त्यादि त्याला घेऊन नगरांत गेल्या । असो. याप्रमाणे उखातबरोबर इआ-वनी इरेक शहरांत आला. तेथें गिलगमे. शच्या पराक्रमाची कीर्ति ऐकून त्याच्याशी मैत्री करण्याची इआ-बनीची मनीषा होती. पण तसे करण्यापूर्वी गिन्गमेशच्या पराक्रमाची थोडीशी परीक्षा घ्यावा असे ज्याला वाटले. तो नगरांत आला त्यावेळी तेथें एक मोठा उत्सव चालं होता. त्यांतच गिलगमेशशी वाहयुद्ध करण्याचा इआ-बनीनं येत केला, परंतु त्या सुमारास गिलगमेश व इआ-वनी या दोघांनाहि एकमेकांशी न लढण्याबद्दल दृष्टांत झाले. त्यामळे यदन करितां ते एकमेकांचे परममित्रच बनले. येथून पुढे इआ-बनी हा अर्ध-नर अथवा वा-नर ( विकल्पानें नर ) गिलूगमेश या वाराचा परम हितचिंतक व सहवासी झाला. यानंतर गिगमेश व इआ-बनीले दोघे खंबावा या राक्षसाने लोकांना फार त्रास दिल्यामुळे त्याच्यावर स्वारी करण्यास निघाले. खंबावाच्या अभेदा किल्ल्यावर स्वारी करण्या पूर्वी गिलामेशने शम्स् या सूर्य- देवाची भक्तीने प्रार्थना केली व मग ते दोघे स्वारीवर आपल्या अनुयायांसह निघाले खवावाने सव देश बन्त कल्न सोडला होता. त्याची आरोळी एखाद्या प्रक्षन्ध साग- राच्या गजनेप्रमाणे भयंकर होती, व जो अभागी मनुष्य त्याच्या तावडीत सापडे यांचा नाश नक्की असे. तथापि हे दोघे वीर धीराने पुढे चालले. पण त्यांना खंबाबाच्या किल्ल्याभोवतालच्या वृक्षादिकांचा प्रचंड आकार पाहून विस्मय वाटल्यावाचून राहिला नाही, कवि म्हणतो:- Thoy stood still and marvelled at the wood Theygazed at the height of the celars. यानंतर त्या वीरांनी खंबाबाशी केलेल्या युद्धाचे अद् भुत वर्णन असले पाहिजे. 'परंतु दुर्दैवाने येथून पुढच्या मजकुराच्या विटेचा तुकडा पडून गेला असल्याने तो मज- कुर नष्ट झाला आहे ! तथापि यानंतरच्या उपलब्ध मजकुराच्या आरंभी खंबाबाच्या शिराचा उल्लेख आला आहे, त्यावरून त्या योध्यांनी खंबाबाशी युद्ध करून त्याचे • मस्तक उडविल्याचा भाग अनुमानाने ताडतां येतो. येथपर्यंत गिलगमेशला सर्वत्र यशच आले असल्याचे वर्णिलं आहे; परंतु येथून