पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/५६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५२) इरेक शहरांतील गिलगमेश या पुरुषश्रेष्टाच्या राजवाड्यांत मला तूं आपल्याबरोबर. घेऊन चल." ही कथा वाचली असतां दशरथाच्या वाजिमेध यज्ञासाठी ( या यज्ञाचं पुत्र- कामेष्टि असें नांव लौकिकव्यवहारांत प्रसिद्ध आहे, परंत वाल्मीकिरामायणांत त्याचे. नांव वाजिमेध म्हणजे अश्वमेध असे दिले आहे.) ऋष्यभंग ऋषीला आणल्याच्या कयेचे स्मरण झाल्यावांचून राहणार नाही. वस्तुतः मागील लंकेच्या वेढ्याचा व या कथेचा वगैरे जो उल्लेख येथे करीत आहे, तो कथा-वस्तुसाम्याच्या दृष्टीने नव्हे, तर केवळ वर्णनसाम्याच्या दृष्टीने आहे एवढे लक्षात ठेवले पाहिजे. कारण रामायण हाहि श्रीरामचंद्र या ऐतिहासिक वरिपुरुषाचा इतिहास आहे. परंतु गिलगमेशचा मूळ उद्गमः काय आहे हे नक्की नाही. दुसरे रामायणाचा प्रसंग भारतवर्षांत घडलेला आहे, व गिलगमेश ही सुमेरियांतील प्राचीन काळची ऐतिहासिक दंतकथा आहे. एवढें ध्यानांत ठेऊन पुढील रामायणांतील वणेनाकडे पहावे म्हणजे कवींच्या बुद्धिविलासांच्या साट- स्याने मनाला आनंद झाल्यावांचून राहणार नाही. वाल्मीकि रामायणाच्या बालकांडाच्या दशमसगांत ही ऋष्यशंगाची कथा येण- प्रमाणे वर्णिली आहे. ऋष्यश्लंगो वनचरः तपस्वाध्यायसंयुतः । अनभिज्ञस्तु नारीणां विषयाणां सुखस्यच ॥ इंद्रियार्थैरभिमतैः नरचित्तप्रमाथिभिः । पुरमानाययिष्यामः क्षिप्रं चाध्यवसीयताम् ॥ गणिकास्तत्र गच्छन्तु रूपवत्यः स्वलंकृताः। प्रलोभ्य विविधोपायैरानेप्यन्ताह सत्कृताः॥ श्रुत्वा तथेति राजाच प्रत्युवाच पुरोहितम् । वारमुख्यास्तु तच्छत्वा वनं प्रविविशुर्महत् ॥ ताश्चित्रवेषाः प्रमदाः गायन्त्यो मधुरस्चनम् । ऋषिपुत्रमुपागम्य सर्वा वचनमब्रुवन् ॥ एकस्त्वं विजने दुरे वने चरसि शंस नः । ततस्तास्तं समालिङ्ग्य सर्वा हर्षसमन्विताः ॥ उपसत्य ततः सर्वास्तास्तमुचुरिवं वचः । एह्याश्रमपदं सौम्य अस्माकमिति चावन् । श्रुत्वा तु वचनं तासां सर्वासां हृदयंगमम् । गमनाय मतिः चक्रे तं च निन्युस्तथा स्त्रियः ॥ अर्थः-नाप्य रंग हा तपस्वाध्यायनिष्ट असा वनचर होता. तो स्त्रिया क विषयसुख यांचा अगदी अनभिज्ञ होता. त्याला आणण्यासाठी मनुष्यमात्राला प्रिय अशा इंद्रियतष्टीच्या साधनांचा उपयोग करून त्या उपायांनी आम्ही त्याला नगराला,