पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/५५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पकडण्याची दुसरीच एक युक्ति काढली. तो म्हणाला " इश्तर देवतेच्या देवळांत त्या देवीला वाहिलेल्या भाविणींपैकी: उखात नांवाची एक सुंदर स्त्री आहे, तिला बरोबर घेऊन तूं इआ-बनीकडे जा, ज्या वेळेस इआ-बना पाणी पिण्यास जाईल, त्या वेळेस उखातने आपली सर्व वस्त्रे सोडून टाकावी व नग्न होऊन तिने इआ-बनोसमोर हाव- भाव करून नर्तन करावे. असे करतांच इआ-वनीचे चित्त एकदम आकर्षिले जाईल व भग इआ-बनीचे सर्व वनचर मित्र त्याचा त्याग करतील !” गिलगमेशच्या या आज्ञेप्रमाणे सैदन केले. तीन दिवसांचा प्रवास केल्यानंतर सैदु शिकारी व उखात असे इआ-बनींच्या निवासस्थानी येऊन पोहोचले. नित्यक्रमाप्रमाणे इआ-बनी पाणां पिण्यास जातांना दिसल्याबरोबर सैदने उखातला सांगितले " उखात, तो पहा इआ- बनी. आता लवकर त्याच्या जवळ जा, आणि आपली वस्त्रे सोडून टाक. मनांत लज्जा अथवा भीति बाळगू नकोस. तुला पाहिल्यावरोवर इआ-वा तुझ्याकडे धांवत येईल, तेव्हां आपले उत्तरीयहि टाकून देऊन त्याला आलिंगन दे व त्याला स्त्रीधर्मान तृप्त कर." उखातने या अनुज्ञेप्रमाणे केले. कवि म्हणतो:- Ukhat loosened her garments, she mcovered her nakedness. She was not faint-hearted and she laid hold upon her soml Slhe opened her garments amd dancel refore him; and ho jay _in her arms She gave him pleasure aiter the manmer of women. Por six days and six nights Ea-bani drew nigh and tarried with Tkhat Alter he had satisfied himself with her ahmdance, He turned his attention to lis cuttlem His gazells lay. and looked at Ea-hami 'The heasts of the field turned away from him.. अर्थः--उखातने आपले वस्त्र सोडले, व शरीर अनावृत केले. ती लाजली नाही अथवा भ्याली नाही. उलट त्याच्यावर तिने आपला पगडा बसविला, नंतर त्याला तिनं आलिंगन देऊन श्रीधर्माने मुदित केले. याप्रमाणे सहा दिवस व सहा रात्री त्याने तिच्या सहवासांत घालविल्या व मग तो आपल्या बनचर मित्रांकडे वळला. तो काय त्याच्या पूर्वसहवासांतील हरणे त्याच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहीनात! यामुळे इआ-यनी विस्मित झाला, परंतु त्या सुंदर स्त्रांच्या मोहात अडकून तो तन्मुखासक्त- दृष्टि झाला तेव्हां उखात प्रेमळपणानं इआ-बनाला म्हणाली " महाराज, आपण इतके पराक्रमी पुरुष असून अशा रानावनांत कां भटकत फिरता? चला आपण अनु व इश्तर देवांनी अधिष्टित अशा इरेक शहरांत जाऊ. तेथें गिलगमेश या पुरुषर्षभाचा (who is like a mountain hull ) भब्य राजवाडा आहे, त्यांत जाऊन आपण सुखाने राहं." तिचं-वचन ऐकून इआ-बनी संतुष्ट झाला. तो कोणाच्या -तरी प्रेमासाची संता झालाच होता, तेव्हां तो तिला म्हणाला, “चल उखात, चल.