पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लाथाडू लागल्या. मनुष्य गुरांप्रमाणे ओरडू लागली. व कुत्मारिका पक्ष्यांप्रमाणे केबिल-- वाण्या होऊन गेल्या. इरेकच्या भरभक्कम प्राकारांचे संरक्षण करणाऱ्या देवता या माशा होऊन इकडून तिकडे भणभण करीत फिरूं लागल्या. त्या शहरांतील रक्षक यक्षगंधर्व वैगरे सर्प होऊन बिळांत जाऊन लपूं लागले. अशा त-हेने सर्वत्र हाहाकार उडाला. तो वेढा तीन वर्षेपर्यंत चालू होता, तोपर्यंत त्या शहराचे सर्व दरवाजे बंद केले होते. फार काय, पण इइतर देवांच्यानेहि डोके वर करवलं नाही. __या ठिकाणी रामायणांतील युद्धकांडांतील लंकेच्या वेन्याचे स्मरण झाल्यावांचून रहात नाही:- रुद्धां तु नगरीं श्रुत्वा जातक्रोधो निशाचरः। विधानं द्विगुणं कृत्वा प्रासादं चाप्यरोहत ॥ स ददर्शावतां लंकां सशैलवनकातनाम । असंख्येहरिगणैः सर्वतो युद्धकांक्षिभिः॥ राक्षसा विस्मयं जग्मुः त्रासं जग्मुस्तथापरे। कृत्स्तं हि कपिभिर्व्याप्तं प्राकारपरिखांतरम् ॥ ददृशु राक्षसा दीना प्राकारं वानरीकृतम्। हाहाःकारमकुर्वन्त राक्षसा भयमागताः ॥ - अर्थः-लंका नगरीला वेडा दिलेला ऐकून लंकापति रावण दुप्पट बंदोबस्त करून लंकेच्या तटावर चढला, तो त्याला असे दिसले की, पर्वत, वन, कानन इत्या- दींनी युक्त अशी ती लंकानगरी सर्व बाजूंनी युद्धतत्पर अशा असंख्य वानरांनी वेढिलेली आहे. नगरीतील कित्येक राक्षस विस्मित होऊन गेले आहेत, तर दुसरे कित्येक अगदी त्रस्त झाले आहेत. तटाभोंवती सर्वत्र वानरांचा गराडा पडलेला पाहून सर्व राक्षस अगदी दान होऊन गेलेले व हाहाःकार करीत असलेले दिसले. याप्रमाणे तीन वर्षे वेढा हेऊन गिळ्गमेश यानें इरेक शहर हस्तगत केलेब त्यावर तो राज्य करूं लागला. परंतु इरेकच्या प्रजेने त्याच्या वर्चस्वापासून आपली मोकळीक करून घेण्यासाठी रात्रंदिवस स्वर्गस्थ देवांची प्रार्थना आरंभली. तेव्हां अरुरु देवतेने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला व गिगमेशला प्रतिस्पर्धी उत्पन्न कर- ग्याचे त्यांना आश्वासन दिले. ते पूर्ण करण्यासाठी अरुरु देवतेने आपले हात पाण्याने स्वच्छ धुवून त्या हातांनी जवळ पडलेल्या विटेचा एक तुकडा मोडून दूर टाकून दिला, त्यापासून इआ-बनी नांवाचा एक विचित्र पुरुष उत्पन्न झाला. विचिन म्हणण्याचे कारण की, त्याचे शरीर सर्वस्वी मनुष्याचे नव्हते. त्याचे मस्तक, कमरेपर्यंतचे शरीर व हात हे मनुष्याचे होते. पण कमरेखालचा भाग पशूचा होता. इआ-बनीच्या शरी-- राचे वर्णन त्या काव्यांत खालीलप्रमाणे दिले आहे:- The whole of his body was covered with mir, He was clothed with long hair like a woman Theqnality of his hair was luxuriaut like a Corn-God