केल्सी गांची झाला होता. त्याच्या घरची स्थिति अगदी गरीवर्वाची होती. चौदा
चर्षांच्या वयाचा तो झाल्यावर, त्याच्या बापाने त्याला एका खोदकाम करणाऱ्या
कारागिराच्या हाताखाली उमेदवार म्हणून काम शिकण्यासाठी ठेवला. मूळापासून
हा मुलगा फार चोकरा व बुद्धिमान् होता. त्याच सुमारास मेसापोटेमियांतील
उत्खनन चालू होते व त्याच्या हकीगती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येत होत्या.
स्यांकडे स्मिथचे लक्ष कुतुहलपूर्वक वेधले गेले. मेसापोटोमियांतून खणून काढलेले
अवशेष लंडन येथील ब्रिटिश म्यूझियम् मध्य आणून ठेविले जात होते. तेथे दररोज
जाऊन तो तासचे तास ते तपासण्यांत घालवा. या त्याच्या कृत्यामुळे मेसापोटोमयांतील
खननकार्याचे सुपरिटेंडेंट सर हेन्री रॉलिन्सन यांच्या नजरेस तो आला. त्यावरून
त्याच्या विषयी चौकशी करितां रॉलिन्सन् यांचा ग्रह स्मिथविषयी इतका अनुकूल
झाला की, त्यांनी त्याला आपल्या अभ्यासाच्या खास खोलीत बसून सुमेरी लिखा-
णाचा अभ्यास करण्याची परवानगी दिली. त्याबरोवर स्मिथचा अभ्यास जोराने
चाल झाला व केवळ आपल्या अकलेने त्याने त्या लिखाणाची गुरुकिल्ली शोधन
काढली. त्यामुळे सन १८६७ साली ब्रिटिश म्यूझिअमच्या असीरिअन विभागावर
सुपरिटेंडेंट म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर थोड्या काळांतच
मेसापोटोमियांतून सुमेरी वाडायांल महाप्रलयाच्या दंतकथा कोरलेल्या विटा लंडन
येथे पाठविण्यात आल्या होत्या, त्यावरील लिखाण त्याने उकलून वाचले. या
त्याच्या हुशारीवरून "डेली टोलियाफ" या वर्तमानपत्राचा त्या वेळचा संपादक
प्रख्यात कवि व वायसेवक सर एड्विन आर्नोल्ड याने आपल्या वर्तमानपत्राच्या
खर्चाने त्याला अधिक संशोधन करण्यासाठी मेसापोटेमियांत पाठविले. याप्रमाणे
तो सन १८७३ त तेथे गेला असता, त्याने असंख्य लिखाणे संपादन केली. पुढल्या
वर्षी पुन्हा त्याने एक वेळा याच कार्यासाठी प्रवास केला. याच कार्यासाठी
त्याची शेवटची सफर सन १८७६ मध्ये केली गेली, व याच सफरीतून परत येत
असतांना त्याला दोषी तापाचा विकार होऊन, वयाच्या ३६ व्या वर्षी अलेप्पो
शहरी त्याचा अंत झाला! अर्थात् याचे कार्य अनेक युरोपिअन देशांतील संशो-
धकांनी पुढे चालविलं; तथापि त्या सर्वांचा अग्रणी होण्याचा मान स्मिथ.
लाच आहे!
या लिखाणांतील मजकुराला इतरत्र मिळालेल्या प्रत्यंतरी पुराव्यावरून, पाचात्य
संशोधकांनी मेसापोटोमियांलि निरनिराळ्या वंशांच्या कारकीदीचे काळ आतां खालील
प्रमाण निशित केले आहेत. ते ध्यानात ठेवणे अवश्य आहे: कारण त्या निश्चित
काळावरून तत्सदृश संस्कृतिदर्शक कल्पना असलेल्या भारतीय संस्कृतीच्या टप्प्यांचे
काळ ठरवितां येतात. अथात् भारतीय बेदांचा काळ ठरविण्याची ही एक पद्धत
आहे; तिच्या शिवाय स्वतंत्र रीतीने त्यांचा काळ लो. टिळकांनी संपात गर्तावरून
ठरविला आहे. हे प्रसिद्धच आहे. परंतु पाश्चात्यांना निश्चित रीतीने कबूल झालेल्या
काळ निर्णयावरूनहि तोच सिद्धांत निघतो, असे दाखविल्याने अर्थातच त्या निर्णयाला
अधिक बळकटी येते. यासाठी सुमेरियन् काळनिर्णय देत आहो.
काळावरून तत्सदृश संस्थान भारतीय वेदांचा काला. टिळकांना संपात
आहे; तिच्या शिलाच आहे. परंतु पावास दाखविल्याने अर्थातच
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/५१
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
