पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/४८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४) शाच्या उलट सूर्य ज्या महिन्यांत पृथ्वाखाली असतो. त्या महिन्यांत सूर्य चोवीस तासांत केव्हांहि दिसत नाही. ला वेळी तेथे पहाटेच्या प्रकाशासारखा auroras Borealis नांवाचा एक प्रकारचा प्रकाश असतो, व त्यांतच सर्व व्यवहार चालू असतात. धवाच्या कमाआधिक नजीकपणाच्या मानानें हैं माहिन्यांचे प्रमाण कमी आधिक असते तेव्हां ज्या वेळी महिनेच्या महिने सूर्य दिसूच शकत नाही, व त्याचा स्वच्छ प्रकाश व त्याची जीवनदायी उष्णता उपलब्ध होत नाही, त्या वेळेस तत्रस्थ लोकांना त्याची फार खंत वाटू लागते व त्यासाठी ते अत्यंत उत्कंठित होतात व अखेर ज्या वेळेस इतके महिने वाट पाहिलेला सूर्य वर येऊ लागतो. त्या वेळेस ते आनंदाने उत्कल होतात. व सूर्यप्रकाश मिळाल्याबद्दल कवने करितात. त्याचप्रमाणे जे जलप्रवाह मोकळे केले जातात असे म्हटले आहे तेहि टिळकांच्या मते खरे पाण्याचे प्रवाह नसून पृथ्वीगोलाच्या रिकाम्या अवकाशांत जो एक पाण्याच्या वाफेसारखा ( Ether) सारखा पदार्थ भरून राहिला आहे, त्यालाच तत्कालीन लोकांनी जल म्हटले आहे. व → जल अंधकाररूपां न कांडून ठेवितो, खालून वर व वरून खाली त्याला मोकळे- पणाने फिह देत नाही, अशी त्यांची समजूत झाली होती. ते जल मोकळे झाले. तेव्हां व्याच्याच प्रवाहाबरोबर खालचा सूर्यहि जणूं काय वर ढकलला गेला. अर्थात् हे दोन्ही पारणाम समकालीन होत. तेव्हां टिळकांच्या उपपत्तीप्रमाणे उत्तर ध्वदशी महिनेच्या महिने टिकणारा अंधकार हाच वृत्र, त्याने कोंडून ठेवलेलें जल म्हणजे अवकाशस्थ ईथर व वृत्राचा नाश म्हणजे या परिस्थितीचा अंत व त्याचेच परिणाम सूर्याची व प्रकाशाची उपलब्धि आणि जलांची मुक्तता हे होत. म या उपपत्तीला पोषक अशा भारतीय वृत्रकथेला समानार्थक अशीच सुमेरी कथा आहे. तेमात हा सर्प अंधकारमय पाण्यांत होता, तो मारल्यानं ते जल मुक्त झाले व प्रकाशहि मोकळा झाला आणि 'मडुकनें तेमातचा हा पराभव प्रकाशाचा देव या नात्याने केला असा जो सुमेरी कथेसंबंधाने किंग या ग्रंथकाराने दिलेला आभप्राय वर नमुद केला आहे, त्यावरून सुमेरी ब हिंदी कथांची एकच उपपत्ति आहे हे सिद्ध होते. अशा रीतीने हिंदा व सुमेरी बाझायांतील ही अद्भत व रम्य कथा आहे. तिचे विवेचन येथपर्यंत केले आहे. त्यावरून हिंदी-सुमेरी संस्कृति' या लेखांत केलेल्या विवेचनास पुष्टिच मिळत आहे. या पुढील लेखांत गिलगमेश या सुमेरी बायांतील महाकाव्याचे दिग्दर्शन करणार आहे.