पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फार काय, पण- .. अन्नाह ते हरिवस्ता उ देवी खोभिरिंद्र स्तवतः खसारः । अहीच्या तडावयांतून मुक्त झालेले. स्वगंगांचे प्रवाहहि इंद्राचा स्तुतिपाठ गाऊं लागले. अहं दां गृणते पूज्य वस्वहं ब्रह्म कृणवं मह्यं वर्धनम् । अहं भुवः यजमानस्य चोदितायज्वनः साक्षि विश्वस्मिन् भरे ॥ दास धारयन यदासु न देवश्चन वटा धारय द्रुशत् ।.. . अहं भुवं यजमानस्य राजनि प्रयद्भरे तुजये न प्रियावृषे॥ माझी भक्ति करणाराला मी द्रव्य, ज्ञान, पराक्रम, आयुष्य वगैरे सर्व देतो. असे या सूक्तांत इंद्राने सांगितले आहे. यो रध्रस्य चोदिता यो ब्रह्मणो नाधमानस्य कारेः।। श्रदस्मैधत्त स जनास इंद्रः ।। जो समृद्धाला व स्तुति करणाऱ्या भक्ताला धन देतो, त्या इंद्रावर श्रद्धा ठेवा. यः पचन्तं यः शंसतं यः शशमानमूति । यस्य ब्रह्मवर्धन ॥ जो इंद्र हविर्भाग देणारांचे व प्रार्थना व स्तुति करणाराचें संरक्षण करितो. यः सुवन्ते पचते दुध्र आचिद्वाजं ददर्षि स किलासि सत्यः । वयं त इंद्र विश्वह प्रियासः सुवीरासो विदधमावदेम ।। हैद्रा तं प्रार्थना करणारांना व हवि देणारांना बल देतोस. तो तूं सत्य आहेस हे निश्चित आहे. म्हणून आम्ही आशा करितों की आम्ही तुला सर्वदा प्रिय असावें व आमच्या वीरपुत्रपौत्रासह तुझी स्तोत्रं गात रहावें. अशा प्रकारच्या या अद्भुतरम्य सुमेरी व आर्य इंद्रकथांत अत्यंत विलक्षण साम्य आहे. हे आतापर्यंत आपण अवलोकिलें आहे. हिंदुस्थानांत वेद हे फार प्राचीन काळापासून मुखोद्गत करण्याचा व परंपरेने स्वरवर्णाक्षराचाहि फरक न होतां जसेच्या तसे संक्रमित होण्याचा परिपाठ असल्याने त्यांचे प्राचीनतमरूप आज आहे तसेच होते. सुमेरी कथांच्या इष्टिकालेखनालाहि सुमेरियन दंतकथांचा अत्यंत प्राचीन आधार आहे. किंग म्हणतो:-Towhat date iro are to assign the beginning of Sume- rian influence in. Babylonia, it is quite impossible to say: though such a date as six or seven thousand years before christ is not an extravagent estimate for the foundation of the earliest. religious centres in the country.. (वरिलोनमध्ये सुमेरिअन् संस्कृतीचा जो पगडा आहे, त्याचा आरंभ निश्चितः रीतीने कधी झाला हे सांगणे जरी अशक्य आहे, तरी विस्तापूर्वी सहा सात हजार वषांपूर्वी सुमेरी संस्कृतीचा आद्यकाल नेणं म्हणजे काही अत्युक्ति होणार नाही.) शप