पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मान सहा दिशा निश्चित केल्या. दिशः सूर्यो न मिनाति प्रदिष्टाः । सूर्याला दिशा नेमून दिल्या. ____ मासां विधान मदधा अधिद्यवि त्वया विभिन्नम् । तूं महिन्यांची व्यवस्था करून दिलीस. त्वं चकर्थ मनवे श्योनान्यथो देवनाजसेव थानान् । देवांचा मार्ग तूं मोकळा करून दिलास. [सुमेरिआंतलि ऊर नांवाच्या शहरचा राजा ऊरगुर हा सिन् या चंद्रदेवतेची आराधना करीत असल्याचे चित्र दाखविले आहे. ( याचा काल स्त्रि. पू. २५०० च्या पूर्वीचा आहे.)] विश्वे देवासो अधवृष्ण्यानि तेऽवर्धयन् सोमबत्या वचस्वथा। भूरि पक्षेभिवचनोभत्र कामः । सख्येभिः सल्यानि प्रवोचत॥ त्वं सुराणां प्रवरः । नत्वा आवामन्यो अमृत त्वदस्ति । महो दिवः पृथिव्याश्च सम्राट् । संजग्मिरे पथ्याः ३ रायोऽस्मिन् समुद्रे न सिंधवो यादमानाः । सर्व देवांनी अनेक भक्तियुक्त ऋचांनी प्रेमाने त्याची स्तुति केली. 'तूं सर्व देवांत श्रेष्ठ आहेस, आमच्यांत तुझ्यासारखा दुसरा (श्रेष्ट ) कोणीहि नाही, तूं मोठ्या स्वर्गाचा व पृथ्वीचा सम्राट आहेस, ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्राला मिळतात, त्याप्रमाणे संपत्तीचे सर्व मार्ग तुझ्या ठिकाणी एकत्र होतात,' इत्यादि प्रकारे देवांनी त्याची स्तुति केली.