पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२२) that their ancestral Vedic Kings and sages were famous historical emperors, Kings and priest-Rings with multitudinous monuinents still existing to the present day. It must also be gratifying to the mo- derm Hindus to flud, that the Vedic and Fpic tradition which their ancestors preserved and transmitted down through the centurios, aud in which they have steadfastly believed, is now substantially proved true, and has lyec one achief means of identifying the Aryan and summerion: civilizations." का म्हणजे- या नवीन लागलेल्या शोधांनी हिंदु लोकांची अंतःकरणे उचंबळून यावी व त्यांची धार्मिक भावना व देशभक्ति जागृत व्हावी, असे त्यांचे महत्व आहे. कारण त्यांच्या वेदांबद्दल व पुराणांबद्दल प्रत्यक्ष व प्रथम ऐतिहासिक पुरावे त्या शोधा- मुळे मिळाले आहेत. त्यांचे वैदिक पूर्वज सुप्रसिद्ध राजमहाराजे, पुरोहित व ऋषी हे सर्व ऐतिहासिक पुरुष होते, व त्यांनी बांधलेल्या इमारती आज मितीसहि उपलब्ध आहेत. हे ज्ञान त्या शोधामुळे झाले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या वेदांतूनं व पुराणां तून जी राजवंशांची व ऋषिकुलांची परंपरा वर्णिली आहे व जिच्यावर. त्यांची पूर्ण श्रद्धा आहे. ती वस्तुतः सत्य आहे व तिच्यामुळेच सुमेरियांत व हिंदुस्थानांत प्रच- लित असलेल्या संस्कृतीचे ऐक्य निश्चित करण्यास महत्वाची मदत झाली आहे. येथपर्यंत आलेले हे संशोधन येथून पुढे हिंदी लोकांनीच विशेष चालवून आपल्या प्राचीन परंपरेविषयीच्या सहानभूतीच्या दृष्टीने आपल्या राष्ट्राचा सुसंगत इतिहास बनवावा, अशी आशा आहे.