निळोबाचा गाथा.
हा गाथा ह. भ० प० विष्णुबोवा जोग यांनी विषयवार निवडून
तयार केला असून ह्याची अनुक्रमणिका अकारादिविल्हे तयार केली
असल्यामुळे, पुस्तकांतील अभंग अनुक्रमणिकेवरून ताबडतोब सांपडतात.
पुस्तकाचे आरंभी निळोबाचें चरित्र जोडले आहे. पुस्तकांत एकंदर
१४५८ अभंग असून पुस्तकाची पाने डेमी अष्टपत्री ३१४ आहेत.
पुस्तक चांगले नाड व ग्लेज कागदावर मोठ्या टाइपांनी छापलेले
असून बाइंडिंग चांगले जाड पुठ्यांचे मजबूत केले आहे. पुस्तकाची
किंमत अवघी १ रु. ठेविली आहे.
शिवकथामृत.
ह्या ग्रंथांत शिवलीलामृतांतील १७ गोष्टींचा सारांश शुद्ध
मराठीत वर्णन केलेला असल्यामुळे साधारण लोकसमाजास व बायका-
मुलांस तो वाचण्यास व समजण्यास मुळीच अडचण पडत नाही.
शिवाय ह्यांत निरनिराळ्या प्रसंगांची २० रंगीत मनोहर चित्रे जाग-
जागी घातली आहेत. पुस्तकाची पाने जाड कागदाची असून बांधणी
मजबूत आहे. किंमत ४६
नुकाराममहाराज यांचे अभंगांची गाथा.
या गाथेत श्रीतुकाराम महाराजांचे सर्व अभंग प्रचलित भिन्न पाठांसह
दिलेले आहेत. क्षेपक अभंग वेगळे देऊन यांत ते अभंग कितपत क्षेपक
आहेत, हे ठरविणारे वर्गीकरण केले आहे. शेवर्टी अभंगांची अनुक्रम-
णिका भिन्न पाठांसह देऊन, तीपुढे कठीण शब्दांचा विस्तृत कोश दिला
आहे. आरंभी श्रीतुकाराम महाराजांची शिकवणूक स्पष्ट करणारा एक
निबंध जोडला आहे. व पौराणिक अभंगामध्ये चार रंगीत व दोन
साधी चित्रे दिली आहेत. गाथेस बायबल पेपर वापरला असल्यामुळे
पुस्तक अगदी हलके व आटपसर: झाले आहे. किं. २॥ रु. शिवाय
टपाल खर्च,
म्यानेजर-चित्रशाळा प्रेस, पुणे.
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१३४
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
