(१२८)
years ago, appears to be much nearer the mark. A lapse of three
centuries, say from 1300-1000 B. C. would amply account for the
difference between what is oldest and newest in Vedic hymn poetry
It is impossible to believe that the Indian branch must have
seperated from the Iraniam only a short time before the beginings
of Vedic literature, and can therefore hare hardly entered the North-
west of India even as early as 1500 B.C.
(अर्थ:-साधारणतः नि. पू. २००० वर्षे हा वैदिक संस्कृतांचा आद्यकाल
समजला जातो. तो जर खरा मानला तर, तेथून बुद्धकालापर्यंतचा १५०० वर्षांचा
अजस्त्र काल, ग्रीसमधील होमेरिअन् व अँटिक यांमधील संस्कृतीइतक्या बदलाला
यावा लागेल ! तेव्हां हा समज खरा नसून मॅक्सम्युलरने केलेला अंदाजच खरा आहे.
त्याच्यामते वैदिक संस्कृतीचा आद्यकाल नि. पू. १२०० वर्षे हा होय. हा अवधि
वेदांतील अत्यंत प्राचीन व अत्यंत अवाचीन भागांतील फरक होण्यास पुरा आहे.
वैदिक संस्कृतीच्या पूर्वी थोडाच काळ हिंदी शाखा इराणी शाखेपासून विभक्त
झाली असेल, हे मानणे अशक्य आहे, व म्हणून या हिंदी शाखेचा हिंदुस्थानांतील
प्रवेश नि.पू. १५०० पूर्वी होणेहि अशक्य आहे. )
या उताऱ्यावरून युरोपीय लोकांनी केवळ अनुमानधक्यावरून कालनिर्णय
कसा केला आहे हे दिसून येईल. यांत गणितात्मक प्रमाणांचा, ज्योतिर्विषयक
उल्लेखांचा, तुलनात्मक दंतकथांचा वगैरे विचारहि केला नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय
मुळीच स्वीकारण्यासारखा नाही. व विशेषतः सुमेरी वाङ्मयाच्या अध्ययनाने या
लेखमालेत दर्शविलेल्या साम्यामुळे तर तो अगदीच त्याज्य होतो. हे सुमेरी वाङ्मयाचे
पुष्टिदर्शक प्रमाण उपलब्ध नसतांनाहि ज्या लो. टिळकांनी केवळ आपल्या बुद्धिप्रभा-
वाने वैदिक संस्कृतीच्या उगमांचा आद्य काल व स्थल ठरविले, त्यांचे कौतुक करावें
तितके थोडेच आहे!
येणेप्रमाणे जलप्रलयापूर्वी हिंदी-सुमेरी आर्य शाखेचे वसतिस्थान ध्रुवसन्निध-
प्रदेश होता हे निश्चित झाले. पुढे प्रलयानंतर तेथून वस्ति हलली व दक्षिणेकडे
उतरली. त्यांपैकी एक शाखा सुमेरीयांत गेली व दूसरी प्रथम कदाचित् हिंदुस्थानच्या
माथ्यावरील पामीर पठारावर राहून नंतर वायव्य सरहद्दीवरून हिंदुस्थानांतील पंचनद.
प्रांतांत आली. हे परिभ्रमण होण्यास शेकडों वर्षे लागल्याने उत्तरध्रवस्थ परंपरा सुमे-
रियांतील व हिंदुस्थानातील वंशजांना फार प्राचीन वाढू लागली होती. कारण
ऋग्वेदांतच कित्येक जुन्या आचारांना 'तानि धर्माणि प्रथमान्यसन् ॥' (हे आचार-
धर्म प्राचीन काळी प्रचारांत होते ) असे म्हटले आहे, व म्हणून कै. महादेव मोरेश्वर
कुंटे यांनी म्हटल्याप्रमाणे:-
- The same myths were understold at different periods of
History in different ways, until at last the myths ceased to be origi-
nated and to grow up and the mythology became stereotyped."
प्राचीन आख्यायिकांचा निरनिराळ्या काळी निरनिराळा अर्थ करण्यांत येऊ
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१३२
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
