पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२७) यांच्या हल्लीहून भिन्न रीतीने असलेल्या वाटांचा काल मी शक्य तितका कमी केला आहे. इजिप्तच्या आद्यकालाचा निर्णय करितांना प्रो. फ्लिंडर्स पेट्रिक यांनी अंगिकार- लेल्या पद्धतीप्रमाणे, ऋग्वेदांत प्रतीत होणाऱ्या दहा भिन्न अवस्थांपैकी दरेकाला १५०० वर्षांचा काल देऊन मा ऋग्वेदाचा आद्यकाल २५००० वर्षांपूर्वीचा निश्चित केला आहे.) __ही प्रो. दास यांची सर्वच विचारपरंपरा अध्रुव अशा अनुमानांवर उभारलेली असल्यामुळे, 'यो ध्वहि परित्यज्य अधुवं परिषवते। ध्रुवं तस्य विनष्टं च अgवं नष्टमेवच ॥ माम अशी त्यांची स्थिति होऊन, त्यांच्या हातचे आर्यांच्या आद्यसंस्कृतीचे मूलस्थान में (उत्ता--) ध्रुव तेंहि नष्ट झाले आहे ! प्रो. दासांच्या नंतर रा. पावगींचा पक्ष. ते हिमप्रलयपूर्व ऋग्वेदकालीन आर्य- संस्कृति हिंदुस्थानांतलीच म्हणतात. हिमालय नि. पू. ८००० च्या सुमारास झाला तेव्हां त्या पूर्वी या संस्कृतीचा त्यांच्या मतें उगम असला पाहिजे. पण तो किती व का. यांचे विवेचन करण्याच्या भानगडीत ते फारसे पडलेच नाहीत! त्यांच्या मताबद्दल डॉ. केतकर यांच्या ज्ञानकोशांत 'बुद्धपूर्व जगत् ' या भागांत म्हटले आहे:-- "...पावगी यांच्या विचारांचे विधान हेच त्याचे खंडण होय. मनुष्य जातीची किंवा चैतन्याची उत्पत्ति हिंदुस्थानांत झाली. हे दाखविण्यासाठी कोणत्या प्रकारचा पुरावा दिला पाहिजे याची या सात्त्विक ब्राह्मणाला कल्पनाहि नसावी असे दिसतें! आप्त- वाक्याने पृथ्वी सपाट आहे असे सिद्ध करू पाहणाऱ्या प्राचीन व अर्वाचीन कोशा- प्रमाणे मनोरंजक म्हणून पावगी यांचे 'आर्यावर्तिक होम ऍण्ड आर्टिक कॉलनीज, हे पुस्तक वाचण्यास हरकत नाही." हा डॉ. केतकर यांचा विनोद बाजूला ठेवला. तरी या उताऱ्याचाच पुढचा भाग पावगींच्या खंडनार्थ समर्पक आहे. या भागांत.डॉ. केतकर म्हणतात:--" उत्तरध्रुवाजवळ जाऊन वसाहत करण्याचा हेतु आणि परत येण्याची कारणे यांवर पावगी काहीच सांगत नाहीत. वसाहत करण्यास जाऊन राहिल्यानंतर परत येईपर्यंत त्यांनी आपली भाषा व संस्कृति बदलली नसेल काय या विषयी पावगींनी विचार केला नाही.". आ यानंतर वेदकालविषयक पाश्चात्य विचारसरणीचा नमुना म्हणून प्रो. मॅक्डोनेल यांच्या संस्कृत वाङ्मयावरील ग्रंथाचा उतारा दिला म्हणजे पुरे. ते म्हणतात:- • 2000 B.C. is commonly represented as the starting point. u- pposing this to be correct, the truly vast period of 1500 years is required to account for a development of language and thonght hardly greater than, that betw.cen the Homeric and the Attic age of Gree0e. Maxmullers earlier estimate of 1200 B. C., formed fforty