पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१२४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२०) केल्यामुळे, त्याच्या बंदिवासांतून सुटून आपल्याला परत मिळाल्या अशा अर्थाचें वर्णन त्यांनी ऋग्वेदांत केले आहे. या विवेचनांतील गाई-अथवा दिवस-ह्या हिवाळ्यांतच चोरल्या जातात, असे जे वेदांत वर्णन आहे, तें ध्रुवाभोवतालच्या प्रदेशाला जुळण्यासारखे आहे. वेदांत या गाई शंभर होत्या असें वर्णिले आहे. याचाच अर्थ सूर्य हा त्या प्रदेशांत शंभर दिवस दिसत नसे, हा होय. अखेर इंद्राने वृत्राशी शरहतूपासूनच्या ४० व्या दिवशी ( चत्वारिंश्यां शरदि) युद्ध सुरू करून त्या गाई सोडविल्या, असा ऋग्वेदांत स्पष्ट उल्लेख आहे. तेव्हा या दिवशी सूर्य क्षितिजाखाली गेला असें निष्पन्न होते. हे बस्तुमान अर्थातच सायनगणनेने खरें असणार व तसे तें टिळकांना मान्यच होते. किंबहुना वेदकालनिर्णयाच्या त्यांच्या सिद्धान्ताचा मूळ पायाच सायनगणनेवर अवलंबून आहे. अर्थात् हीच गणितपद्धति शास्त्र, परंपरा व पूर्वतिहास यांनी सिद्ध होते, व त्या पद्ध- तीने शरहतूच्या ४० व्या दिवशी इंद्र-वृनयुद्धाला सुरुवात झाली. या गाई सोडवण्याबरोबरच सूर्याचा उदय झाल्याचाहि परिणाम वृत्रहननाने झाल्याचे नग्वेदांत वर्णिले आहे. वरील उपपत्तीने हे अगदी सहज समजण्यासारखे आहे. किंबहना सूर्य उगवल्यामुळेच दिवस मोजता येऊ लागले. म्हणजेच सर्योदयामळेच गाई उपलब्ध झाल्या हे उघड आहे. वृत्रहननापासून सूर्योदय होणाऱ्या या परिणामाचे वर्णन वेदांत स्पष्ट ऋचांनी केले आहे, व आम्हीहि तें या मालेच्या दुसऱ्या लेखांका नील द्रवन्त्रकथेच्या प्रसंगी सुमेरी कथेच्या साम्याने वर्णिले आहे.म्हणून त्याची पुनरुक्ति येथे करीत नाही. तथापि हिवाळ्यांत सूर्य नाहीसा होऊन तो बसंतारंभी उदय पावण्याच्या या कथेवर वेदांत दुसरें एक रूपक बसविले आहे, त्याचा येथे खास उल्लेख करावयाचा आहे. कारण-अत्यंत आश्चर्याची गोष्ट की-त्याच रूपकाची कथा हवेहव तशीच समेगवाङ्मयांत वणिली आहे. त्यासाठी प्रथमतः आपण वैदिक कथा काय आहे त पाई. वेदांत अश्विनी म्हणून जे दोन देव वर्णन केले आहेत, त्यांचे पराक्रम वर्णन करतांना अशी कथा सांगितली आहे की, एकदां रेभ नांवाचा एक दैदप्यमान ऋषि काही दिवस व रात्री समुद्रात बुडून गेला, तेव्हां त्याच्या माणसांनी शोक केला व अश्विनौ देवांची प्रार्थना केली, तेव्हां त्यांनी रेभाला समुद्रांतून बाहेर काढिले. 'अप्स्वतः विद्युतं रेभमुदनि प्रवृक्तम् । उन्निन्यथुः सोममिव वेण ॥ (ऋ. वे. १-११६-२४ ) त्याचप्रमाणे भृज्यु हा ऋषी, ‘अवविद्धं तो यमप्रखंतः अनारंबणे तमसि प्रविद्धं । उदश्विभ्या मिषिताः पारयति ॥ (न. वे. १८२-६)