पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१२२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११८) तथापि 'आर्टिक होम् इन् दि वेदाज' व 'ओरायन' या दोनहि ग्रंथांत टिळकांनी भारतीय आयांच्या सुमेरी आर्याशी आढळून येणा-या संबंधाविषयी विशेष, उल्लेख केलेला नाही. परंतु त्यानंतर त्यांनी सन १९०४ साली बाँबे प्रेसिडेन्सी एसोसिएशन् या संस्थेच्या जागेत 'ग्रॅज्युएटस् एसोशिअशन् ' च्या विद्यमाने 'खाल्डियन् व हिंदी वेद ' या विषयावर एक व्याख्यान दिले. ते पुढे भांडारकर प्राच्यविद्यासंशोधनसंस्थेच्या भांडारकर स्मारक-ग्रंथांत सन १९१७ साली-व त्यानंतर ' Vedic chronolo- gy and Vedanga Gyotish ' या स्वतंत्र पुस्तकांत सन १९२५ साली प्रसिद्ध झाले आहे. त्यांत टिळकांनी, तैमात, आलिगी. विलिगी उरूगृला, यव्ह. अप्सु, मना इतक्या वेदांत आढळणाऱ्या शब्दांचा खाल्डियन म्हणजेच सु मेरी वाङ्म यांत पत्ता लागतो असे दाखवून, या दोनहि वाडायांचा परस्पर संबंध असावा, असं अनमान काढले. परंतु या लेखमालेच्या मागील अंकांत आम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांना समग्र सुमेरी वाङ्मयः उपलब्ध न झाल्यामुळे असो. अगर तें तसे झाले असले तरी, त्यांच्या अनेक इतर उद्योगांमुळे त्यांना त्याचे संपूर्ण परीक्षण करण्यास सवड न मिळा- ल्याने असो, पण सुमेरी व हिंदी वेदांतील आम्ही या लेखमालेत दाखविलेली अत्यंत महत्त्वाची अशी समानस्थले दाखवून त्यांनी त्यांचे विवेचन केले नाही. तो प्रयत्न साकल्याने या लेखमालेत आम्ही केला आहे, व त्या प्रयत्नाअंती लो. टिळकांनी काढलेल्या निष्कर्षाला विलक्षण पुष्टि मिळत असल्याचे दाखविले आहे. बाकाची महत्त्वाची साम्ये तर स्वतंत्र रीतीने त्यांच्या सिद्धांताला पोषक होत आहेतच. परंतु ती बाजूला ठेऊन टिळकांनी आपल्या ग्रंथांत जी उत्तरध्रुवप्रदेशों अनुभविल्या जाणाऱ्या ऋतुमानाबद्दलची व इंद्रवृत्रयुद्धाच्या खऱ्या अर्थाबद्दलची जी. प्रमाणे दिली आहेत, तेव टींच जरी विचारांत घेतली, तरी टिळकांनी अकल्पित अशा रीतीने सुमेरी वाड्मयां तील उल्लेख भारतीय वेदांतील प्रमाणांचें आश्चर्यकारक रीतीने समर्थन करितात असे दाखविले आहे. वैदिक वाङ्मयांतील सर्व प्रमाणांचा निर्देश लो. टिळकांनी आपल्या Arctic Home in the Vedas' या ग्रंथांत केला आहे.तेथे त्यांनी जी अनेक प्रमाणे दिली आहेत. त्या सर्वाचे विवेचन करण्याचे प्रयोजन नाही. परंतु त्यांच्या मतें इंद्र- वृत्रयुद्धकथेच्या खऱ्या अर्थोपलब्धीने मूलगृहनिश्चयास फार महत्त्वाची मदत होत आहे. ते म्हणतात की, या युद्धाचें भारतीय वेदांत चार महत्त्वाचे परिणाम झालेले वर्णिले आहेत, ते असे:-(१) वृत्राच्या अटकेत असलेल्या गाईची मुक्तता (२) त्याच्याच बंदीत पडलेल्या जलप्रवाहांची मुक्तता, (३) उषेचा उदय व (४), सूर्याची प्राप्ति. अर्थात् ज्या उपपत्तीने हे चारहि परिणाम झाल्याचा समाधानकारक खुलासा मिळेल, ती उपपत्ति अधिक ग्राह्य होय. टिळकांच्या मते ती उपपत्ति कोणती. आहे हे समजण्यापूर्वी उत्तरध्रुवाजवळील तुमानात्मक परिस्थिति कशी आहे हे पाहिले पाहिजे. उत्तर ध्रुवप्रदेशी उभे राहिलेल्या मनुष्यास आकाशस्थ ज्योतीचें भ्रमण एका