पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/११८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१९४) आहे. त्या मताप्रमाणे हिंदुस्थानदेशच, वैदिक संस्कृतीची मूलभामि होय. त्याच्या दोन पुरस्कर्त्यांपैकी दोघांचा निष्कर्ष एकच असला, तरी दोघांची कारणे निराळी आहेत. सदरपक्षाचे एक पुरस्कर्ते बाबू अविनाशचंद्र दास यांनी आपली उपपत्ति साकल्याने आपल्या Rig-vedic India, या पुस्तकांत मांडिली आहे. तिचा मुख्य आधार भौगोलिक आहे. थोडक्यांत त्यांचे म्हणणे असे आहे की, वेदांत जी भौगोलिक परिस्थिति वर्णन केलेली आहे, तशी जरी आज आपल्याला हिंदुस्थानांत दिसत नसली तरी ती वेदकाळी तशी होती. उदाहरणार्थ, वेदांत पंञ्चनदप्रांतांत सरस्वती नदी वर्णिली आहे व ती थेट समुद्रास जाऊन मिळते असेंहि वर्णन आहे. वस्तुतः आज पंजाबांत सरस्वती म्हणून कोणतीच नांव घेण्यासारखी नदी नाही. शिवाय वेदां- तील सरस्वती नदीचा गमनमार्ग पाहिला असतां, ती हलींच्या राजपुतान्यांत आली पाहिजे. आतां हल्ली राजपुतान्याच्या जागी मुळी समुद्रच नाही! तेव्हां प्रो. दास म्हणतात भूगर्भशास्त्रदृष्टया पृथ्वीच्या पृष्टभागावर हजारों वर्षांनी फरक झाले आहेत; व हल्ली जेथें राजपुताना आहे, तेथें पूर्वी समुद्र असला पाहिजे. व सरस्वती नदीहि तेथे येऊन समुद्रास मिळत असली पाहिजे. या समुद्रामुळे पंजाब एका बाजूला व दक्षिण हिंदुस्थान दुस-या बाजूला असे हिंदुस्थानचे दोन तुकडे त्या काळी पंडलेले असावे. पण पढ़ें हिमालयांतून उगम पावणाऱ्या नद्यांमधून वाहत येणाऱ्या मातीने हलके हलके हा समुद्र भरून जाऊन तेथें जमीन झाली असावी. अर्थात् इतकें रूपांतर होण्यास कालावधीहि फार लागणार व तो दासबाबूंच्या मते ५०००० ते ३०००० पर्यंत होय. अर्थात् ज्या वेदांत सरस्वती नदी समुद्राला मिळण्याचा उल्लेख आहे, त्या वेदांचा काळहि इतका मागे जातो. तेव्हां दासबाबूंच्या मते वेदांचा काळ निदान स्त्रि. पू. ३०००० वर्षे होय व अथोतच वेदांची आर्यभूमि हिंदुस्थानांतील पंजाबप्रांत हीच होय. भूगर्भशास्त्राच्या काल्पनिक अनुमानापेक्षा या उपपत्तींत अधिक बळवान् पुरावा नसल्याने हिला विशेष महत्त्व प्राप्त होऊ शकत नाही. शिवाय. ज्योतिषात्मक पुरावा. सुमेरी इतिहासाचा पुरावा, वगैरे सर्व या अनुमानाच्या विरुद्धच असल्याने एक 'आश्चर्यात्मक प्रमेय ' या पलीकडे दासबाबूंच्या म्हणण्याला अधिक महत्त्व प्राप्त होत नाही. वेदांचे मूलस्थान हिंदच मानणारे दुसरे गृहस्थ म्हणजे रा. नानासाहेब पावगी हे होत. यांचे मत थोडक्यांत येणेप्रमाणे आहे:-भूगर्भशास्त्राप्रमाणे उत्तरध्रुवाजवळील प्रदेश सुमारे खि. पू. ८००० वर्षांच्या पूर्वी वस्तियोग्य होता. त्यानंतर त्या काळाच्या सुमारास तेथे एक हिमप्रलय होऊन तो प्रदेश वस्तीला अयोग्य झाला, हे मत रा. पावगी यांना ग्राह्य आहे. पण ते म्हणतात की " या हिमालयाच। वेदां- तील आद्य जो ऋग्वेद, त्यांत कोठेहि उल्लेख नाही; परंतु तो उल्लेख अथर्ववेदांत प्रत्यक्ष केला आहे. यावरून ऋग्वेदांतील सर्व ऋचा प्रलयपूर्वकालांत रचिल्या गेल्या. याविषयी