पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक यथा १ठ पर वाडा, (१२३) रखी चोक, पुणे-४११.३. 'अस्य' हा संस्कृत षष्टींचा प्रत्यय आहे. पाली भाषेत जसे त्याचे ' अस्स' हैं रूप होते, त्याचप्रमाणे हे रूप आहे. व 'अमक्याचा शिक्का ' अशा अर्थी तें वापरलेले आहे. अशा प्रकारची इतरहि वैयाकरणिक साम्ये सुचविता येतील, व त्यावरून दोनहि संस्कृ. तींच्या विनिमयाचा स्पष्ट पुरावा मिळू शकेल. परंतु वादाचा प्रश्न हा नव्हे. आम्ही दाखविलेले भाषासाम्य आढळून येत असले, अथवा एन्संगर्ने 'ओतिन् ' म्हटलेला प्रांतच ‘एदिन् । म्हणून सुमेरी लखाणांत उल्लेखिला गेला असला, तरी त्यावरून सुमेरी देशातील लोक त्या सुमारास वसाहत करण्यासाठी त्या प्रांतात आले, हेच अनु- मान कसे निघते हैं समजत नाही. स्वतंत्र भारतीय आयोची वस्ति तत्पूर्वीपासून त्या प्रांतांत असून त्यांचे सुमेरियाशी दळणवळण असल्यानेहि दोनहि वाडायांत तसा उल्लेख येणे अगदी शक्य आहे. त्यासाठी सुमेरी संस्कृतीची वैदिक संस्कृति उपशाखा होय असें मानण्याची आवश्यकता नाही. प्रथमतः सुमेरिआंतून कांही दर्यावर्दी लोक हिंद- स्थानांत आले. या वडेलच्या म्हणण्याला रतिमान पुरावा नाही. वेदांत व सुमेरियांत काहीं सारखा उच्चार भाषणारी नांवे आहेत, म्हणून वैदिक लोक हे मूळ सुमेरिआंतून आले. या निगमनाला कसे काय प्रमाण मिळतें तें ईश्वर जाणे अगर वडेल जाणे । नामसादृश्यावरून कोणत्या तरी भागांतले लोक उठून दुसरीकडे गेले असें म्हणावयाचे असल्यास. हिंदुस्थानांतील लोक सुमेरिआंत गेले, असें कां म्हणूं नये ? याला डेल कांहीं कारण देऊ शकत नाही. यानंतरचा त्याचा पुढला तके-अथवा प्रमेय-तर फारच विचित्र आहे! त्याच्या मते एकदा सिंधुप्रांतात आलेले समेरी आमा शतकांनंतर नष्ट झाले व नंतर जवळ जवळ दीड दोन हजार वर्षांनी दुसरे आर्य खि प. ७०० च्या सुमारास हिंदुस्थानांत आले ! याला आधार पाहिला तर काही नाही. बरें आर्य कोठन आले व ते कोणत्या वंशांतील? याला उत्तर नाही. याच आयात पडे उपनिषदादि ग्रंथ झाले व महाभारत युद्ध झाले, याला आधार काय ? तर काहीं नाहीं ! वस्तुतः हिंदुस्थानांतील आर्यपरंपरेला खंड कधीहि कोहि पडलेला नाही शिवाय वेदांचा काल पाश्चात्यांच्या मताने अगदी अलीकडे म्हणजे त्रि. पू. १२०० वर्षे ठरविणाऱ्या मॅक्सम्युलरसाहेबापासून तो सदरचा काळ स्त्रि. पू. ४५०० वर्षांचा पाया टिळक अथवा प्रो. हर्मान् याकोबीपयंत कोणाचेंच मत आर्य लोकांच्या अश्वप्दतीच्या या वेडेली उपपत्तीला अनुकूल नाही. तेव्हा या सव गोष्टींचा विचार करितां हिंदस्थानांतील भारतीय आर्यसंस्कृति सुमेरीसंस्कृतीची पोटशाखा असर दोहाचें मूलस्थान सुमेरिया हाच दंश होय, ही वडेलची उपपत्ति मुळीच टिकण्या सारखी नाही. हसरा पक्ष याच्या अगदी उलट मताचा आहे. वस्तुतः या पक्षाच्या कीचा विचारच केलेला नाही. तथापि हिंदी-सुमेरी संस्कृति मिट झाल्याने वैदिक संस्कृतीच्या मूलस्थानाबद्दल त्यांनी एकच आहे, असे आता सिद्ध झाल्याने वैदिक संस्कृतीच्या म नातच हिंदी-सुमेरी संस्कृतिविषयक समजून त्याचे विवेचन केलें