पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०५) वानर व मनुष्य यांच्यामधील अंतराच्या दुव्यांचा दर्शक असा हा फरक आहे. या दृष्टीने नाकांची तुलना करतांना जो मापनांक घेतात त्याला Nasal Index अथवा नासांक म्हणतात. नाकाच्या आतल्या छिद्राची रुंदी आणि नाकाच्या मूळापासून शेंड्यापर्यंतचे अंतर, यांच्यामधील प्रमाणास नासांक म्हणतात. अर्थात् या प्रमाणाने मोजता, ज्यांच्या नाकांच्या लांबीच्या मानाने त्याची रुंदी सर्वांत कमी असेल. त्यांना तुंगनास ( Leptorrhine) म्हणतात; त्याहून अधिक रुंदी ज्यांच्या नाकाची असेल, त्यांना मध्यमनास ( Mesorrhine ) म्हणतात; व सर्वांत अधिक पसरट अथवा फतकडी नाकें ज्यांची असतील, त्यांना पृथुनास (platin-hine) असें म्हणतात. पहिल्या वर्गाचा नालांक ७० च्या आंत असतो, दुसन्यांचा ७०-८० असतो, व शेवटच्यांचा ८५ च्या वर असतो. सर्वसाधारण रीतीने श्वेतवर्णीय लोक निरुंद नाकाचे, कृष्णवर्ण लोक रुंद नाकाचे व पीतवर्ण लोक मध्यम नाकाचे असतात. अर्थात् नेहमीप्रमाणे यांत अपवाद हे सांपडावयाचेच. हिंदुस्थानांतील शुद्ध आर्य व उच्च वर्णीय लोक बहुतेक निरुंद नाकाचे असतात, द्राविड लोक मध्यम नाकाचे असतात व अगदी रानटी जाती मात्र रुंद नाकाच्या असतात. वेदकाली हि हिंदस्थानांत आर्य निरुंद नाकाचे असल्याबद्दल वेदिकवाड्मयाचा पुरावा आहे. त्याच- प्रमाणे सिंधमधील सांगाडेहि निरुंद नाकाच्या लोकांचेच असल्याबद्दल मार्शल साहेबांनी प्रसिद्ध केले आहे. आयोशिवायचे त्या काळचे द्राविडी लोक म्हणजेच असुर लोक होत. ते मध्यम नाकाचे होते. व तत्कालीन रानटी लोक-ज्यांना दस्यु म्हणत ते रुंद नाकाचे असल्याने त्यांना वैदिक लोकांनी 'अनास' बिननाकाचे म्हणजेच नकमा अथवा चपट्या नाकाचे म्हटले आहे. मेसापोटेमियांतील प्राचीन लोकांपैकीचे पर लोक निरंद नाकाचे व त्यांच्या नंतरचे बबिलोनी लोक मध्यम नाकाचे असल्यावर प्रत्यक्ष व लेखी पुरावाहि यापूर्वी आपण पाहिलाच आहे. यानंतर केसांचा विचार येतो. स्थूलमानाने लोकरीसारख्या कुरळ्या केसांच्या लोकांत आफ्रिकेतील नीग्रो, टासमानिअन, बुशमेन, पापुअन् वगैरे लोक समाविष्ट होतात. सरळ केसांच्या लोकांत मोंगल, चिनी, जपानी वगैरे पीतवर्णी लोक येतात व नागमोडी केसांच्या लोकांत श्वेतवर्णीय लोक येतात. यांतच हिंदु,आर्य, अफगाण सोरी लोक व यरोपियन लोकांचा समावेश होतो. या दृष्टीने प्राचीन काळच्या लोकांचे परीक्षण करण्यास मात्र प्रत्यक्ष साधन उपलब्ध नाही. कारण त्या काळचे केस प्रत्यक्ष मिळविणे जवळ जवळ अशक्य आहे. सुमेरी पुतळ्यांच्या केसांचे वळण पाहता सुमेरी लोकांचे वळण नागमोडी असल्याचे दिसून येते. अखेरचा फरक उंचीचा होय. पण हा फरक वरील चारहि फरकांच्या मानाने सर्वात कमी महत्त्वाचा आहे, असे तज्ञांचे मत आहे. पृथ्वीवरील मनुष्यजातीपैकी भनेक जातींची उंची मोजता, साधारणतः असे प्रमाण काढण्यात आले आहे की मनुष्याच्या उंचीचें मध्यमान ५ फुट ६ इंच आहे. ५ फुट ८ इंचाहन अधिक उंचीचे लोक उंच समजावयाचे; ५ फुट ४ इचाहून कमी उंचीचे लोक ठेंगणे म्हटले चाहन कमी असलेले लोक खुजे मानले जातात. सिंधमधील