पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१०८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०४) आतां वरील सर्व प्रकारांपैकी दरेकाचा विचार करून त्यांत हल्लीच्या मनुष्य- जातीतील कोणकोणत्या गटांचा समावेश होतो, ते आतां आपण पाहूं. १ प्रथम वर्णाचा विचार करतां, एकंदर चार मुख्य वर्ण ठरवितां येतात; ते म्हणजे श्वेत, पीत, रक्त व कृष्ण हे होत. पैकी रक्त अथवा ताम्र म्हणजे तांब्यासारख्या तांबड्या वर्णाचे लोक, फक्त अमेरिकेतील मूळ रहिवासी.-ज्यांना Red Indians ( तांबडे इंडियन ) म्हणतात. तेवढेच असल्याने व त्यांची अमेरिकन लोक आज अनेक वर्षे लांडगेतोड करीत आले असल्यामुळे. ते दिवसेंदिवस नामशेष होतच चालल असल्याने, त्यांचा विशेष विचार करण्याचे कारण नाही. बाकींच्या तीन वणांपैकी श्वेत अथवा गोया वर्णांत उत्तर व पूर्व युरोपांतील लोकांचा ताम्रगौर वर्ण, पश्चिम युरोपांतील लोकांचा निस्तेज गौरवर्ण, अफगाण व उच्च हिंदूंचा पीत गौरवर्ण, सेम- टिक लोकांचा, बर्बर लोकांचा व असीरिअन् लोकांच्या वंशजांचा (ज्यांच्यात, कुर्डिस्थानांतील लोक, आर्मीनिअन व यहुदी यांचा समावेश होतो.) कपिल गौरवण; इतक्या प्रकारांचा अंतर्भाव होतो. २ पीतवर्णीयांत पांडरट पिवळ्या लॅप, युक्राईन व तुर्क लोकांचा, फिकट-पिवळ्या अशा दक्षिणेकडील व उत्तरेकडील मोंगल लोकांचा. सतेज पीतवर्ण अशा पॅटागोनिअन व अमेरिकेच्या दाक्षिणेतील व उत्तरेतील लोकांचा. कपिल-पांत अझा पॉलिनशिअन् व इंडोनेशियन् लोकांचा व पिंगट-पिवळ्या एस्किमोंचा समावेश होतो... ३ कृष्णवर्णीतील लोकांत अगदी कोळशासारख्या काळ्या बंटु, निग्रो व शिक्षा लोकांचा, तांबडसर काळ्या वर्णाच्या नेग्रिटोंचा, पिंजट-काळ्या अथवा चॉकोलेटप्रमाण वर्णाच्या आस्ट्रेलिआंतील मूळ रहिवाशांचा, वगैरेंचा समावेश होतो. आतां यापुढे आपण मस्तकाच्या आकाराचा विचार करु. येथून पुढाल विचार करितांना मात्र आपल्याला जगांतील सर्व जातींचा विचार करण्याचे कारण नाही. आपला सिद्धांत स्थापन करण्यासाठी जरूर तेवढ्यापुरतेच विवेचन आपण करीत जाऊं. तेव्हां या शीर्षमापनाच्या दृष्टीने पाहतां लंबशीषर्षांच्या गणनेत युरी- पिअनांपैकी ट्यटन लोक, हिंदुस्थानांतील आर्य लोक, व इतर काही लोक यां समावेश होतो. प्राचीन काळांतील लोकांपैकी सुमेरी लोकहि सर जॉन मार्शलच्या, मागे दिलेल्या, अभिप्रायाप्रमाणे लंबशीर्षच होते. व त्यांच्याच पुराव्यावरून सिंधमधील सांपडलेल्या सांगाड्यांच्या शार्षमापनावरून तेथील लोकहि लंबशीर्ष असल्याचे सिद्ध झाले आहे. याच्या उलट सुमेरी लोकांनंतर त्यांच्या देशांवर राज्य करणारे बबि- लोनिअन् लोक हे पृथुशीर्ष होते, यावरूनहि ते भिन्नवंशीय असल्याचे शास्त्रीय रीत्या सिद्ध झाले आहे. तिसरा फरक नाकासंबंधाचा होय. शीषमापनापेक्षांहि नासामापनाचे महत्त्व फार आहे. टोपीनार्ड या शास्त्रज्ञाने म्हटल्याप्रमाणे:- The character of the nose establishes a transition from the Ape to the Man.