पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०२) दिसून येईल. यासाठी एकेक केस घेऊन तो ताठ धरून मध्येच तोडावा व मग त्याचे टोंक दुर्बिणींतून पहावे, म्हणजे असे दिसेल कीः- लोकरीसारख्या कुरळ्या केसांच्या तोंडाचा आकार लंबगोल 0 असा असतो, मृदु व सरळ केसांच्या तोंडाचा आकार वर्तुलाकृति ० असा असतो, व नागमोडी केसांच्या तोंडाचा आकार मध्यम प्रकारचा ० असा असता. HE यावरून हे केसांचे प्रकार निश्चित रीतीने ओळखता येतात; व अशा प्रकारच केंस असणाऱ्या मनुष्यसमुदायांचे भेद निश्चित रीतीने पडतात. ५ अखेरचा व पांचवा मुख्य फरक उंची हा होय. हा फरक मनुष्यज्ञातीच्या पोटभेदाचा निश्चित असा पुरावा होऊ शकत नाही. हे खरे आहे. तथापि तें एक प्रमाण आहे, इतकें खास. वैयक्तिक अपवाद सोडून निश्चित अशा समूहांची उचा मोजली, तर त्यांची सरासरी मर्यादा किमान ४ फूट ४ इंचापासून तो कमाल ५ फूट १० पर्यंत असते. ही उंची अर्थातच हवापाणी. खाद्यपेय. आनुवंशिक परिणाम इत्यादि अनेक कारणांवर अवलंबून असते. खाण्याचा पुरवठा अनिश्चित, अपुरा अथवा अपौष्टिक असा असला, तर उंची कमी होते. त्याचप्रमाणे नेहमी बैठ्या कामाचा संवय असल्यासहि तसाच परिणाम घडून येतो. सन १८८४ ते १८८९ च्या अवधीत स्वित्झर्लंड देशांत केलेल्या तपासणीवरून असे दिसून आले. की, आपला व्यवसाय करण्यासाठी चालावे लागणाऱ्या धंद्याच्या लोकांपैकी शेकडा ४७ लोकांची उंची ५ फूट ७ इंचांच्यावर होती; तर याच्या उलट शिंप्याचें बैठे काम करणाऱ्या लोकांत इतकी उंची फक्त शेकडा ७ जणांची होती, कारखान्यांत काम करणाऱ्यांची, चांभा- रांची व विणकाम करणाऱ्यांची ती ११ जणांची होती, बुरूड, व झाडूवाल्यांत ती शेकडा १२ जणांची होती. सुपीक व सपाट मैदानावर राहणाऱ्या लोकांपेक्षां डोंग- राळ प्रदेशांत राहणाऱ्या लोकांची उंची कमी असते. पिण्याच्या पाण्यांत चुन्याचा भाग कमी असल्यासहि उंची कमी होते, व म्हणून भूमध्यसमुद्राच्या आसपासच्या पाण्यांत चुन्याचा पुरवठा कमी असल्याने, त्या प्रांतांतून राहणाऱ्या लोकांची उंची कमी आहे. लवकर लग्न होणाऱ्या लोकांची उंचीहि कमी असते. मात्र या ठिकाणी लग्न या शब्दाच्या अर्थाचा खुलासा करणे अत्यंत अवश्य आहे. युरोपियन व अमे- रिकन् लोकांत लग्न व स्त्रीपुरुषसंबंध हे समकालीन होत असल्याने एकाचाच दुसरा मान्द पर्यायवाचक मानला गेला आहे. यामुळेच त्या अर्थाने .हिदुस्थानांतील लोका- मधील लग्नाचा अर्थ ते लोक करीत असल्याने, मिस मेयोसारख्या निंदकांना हिंदु- स्थानची बेअब करण्यास सांपडते. वस्तुतः गेल्या पन्नास साठ वर्षातील हिंदुस्थानांतील पिढी, मार्गाल काही पिढ्यांपेक्षां तरी उंचीने कमी असल्याची प्रत्यक्ष माहिती मिळते; तरी पण मागल्या पिढ्यांत लग्ने लवकर होत असत! या विरोधाभासाचा खरा खुलासा हा आहे की, त्या मागील पिढ्यांतील स्त्रीपुरुषांची लग्ने लवकर होत. तथापि त्यांच्यात समाईक कुटुंबव्यवस्था असल्याने त्या वेळी स्त्रीपुरुषसंबंध होणे तर अशक्यच होते. परंतु पुढेहि योग्य वय होईपर्यंत त्यांना तशी संधि मिळत नसे. व त्यानंतरहि काही