पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( वरच्या वर्गातील पुरुष दोन वस्त्रे वापरीत. एक धोतर व दुसरें उत्तरीय. धोतर सुमेरियांतील लोकांच्या रिवाजाप्रमाणे कमरेभोवती गुंडाळलेले असून, उत्तरीय डाच्या खांद्यावरून व उजव्या बगलेखालून घेतले जात असे व त्यामुळे उजवा हात कामासाठी मोकळा रहात असे. पुरुष लहान दाव्या व गलमिशा ठेवीत व सुमेरियन लोकांप्रमाणे ते मिशा कधी कधी काढीत असत. डोक्याचे केस मागे फिरवून त्यांची गांठ बांधीत असत व तिच्या भोवती एक पट्टी अथवा फीत बाधीत. स्त्रीचा एकच पुतळा आतापर्यंत सापडला आहे. त्यांत त्या स्त्रीचे केस मार्ग मोकळे सोडलेले आहेत. पण अर्थातच तेवढ्यावरून तसे केस मोकळे सोडण्याचा सावत्रिक रिवाज होता किंवा काय, याविषयी काही अनुमान करता येण्याजोगे नाही. सर्व जातीचे लोक अंगावर दागिने मात्र विपुल घालीत. माळा व अंगठ्या या स्त्रीपुरुष दोघेहि घालीत व यांशिवाय स्त्रिया कर्णफुलें, बांगड्या, कमरपट्टे व सांखळ्या वाप- रीत असत.) वैदिक वाजायावरूनहि हे वर्णन फार आश्चर्यकारक रीतीने पटते; ते असेंः- पुरुष दोन वस्त्रे वापरीत ( अथर्ववेद ४-७-६), त्या वनांना परोधानम् व नीवि असें म्हणत ( अथर्ववेद, ८-२-१६ ), उत्तरीयाला नक्षीची किनार असे; अशा नक्षीच्या काठाच्या उत्तरीयाला दोन बाजूला प्रातःकालीन व सायंकालीनं सूर्य अस- लेल्या आकाशाची मजेदार उपमा एके ठिकाणी दिलेली आहे. काहीजण हजामत कर- चीत ( अथर्व वे. ६-५८ ), परंतु इतर कित्येक लोक दाढीमिशा ठेवीत (ऋ. वे. १०-२६-७).केस मागे सारून त्यांची गांठ मारीत; ती कोणी कोणी उजव्या बाजूला मारीत व कोणी डाव्या बाजूला मारीत. मलबारांतील स्त्रिया अजूनहि आपल्या केसांचा बुचडा असाच उजव्या अगर डाव्या बाजूस बांधतात. पैकी वशिष्ठगोत्री लोक ती उजव्या बाजूला वांधीत. (ऋग्वेद. ७-३३-१) वन्ने लोकरीची असत, तशीच कापसाचीहि असत. (ऋ. वे. ५-४४-११). याप्रमाणे समरियांतील सुमेरीलोक व वैदिक आयलोक यांच्यात अत्यंत आश्चर्य- कारक असें स्वरूपात्मक, वेषात्मक व आचारात्मक साम्य आपण प्रत्यक्षतः अवलो. जन केले. व त्यावरून हे उभय लोकसमाज एकवंशीयच असले पाहिजेत असें सिद्ध केले. अशा दृष्टीने साधम्यदृष्ट्या आपल्या सिद्धांताला पुष्टि मिळाली. ही अन्वयात्मक पुष्टि मिळाल्यावर आतां व्यतिरकदृष्ट्या अथवा वैधर्मदृष्टया काय माहिती मिळते. तें आपण पाहूं. इतका वेळ सुमेरी लोकांचे परीक्षण आपण केले, पण मेसापोटोमियांत सुमेरि- अनाहुन भिन्नवंशीय अशा सेमेटिक घंशांतील लोकांचे अवशेषहि तक्षकलेच्या रूपाने सांपडले आहेत, त्यांची चित्रेहि आता आपण पाहूं. या लेखमालेत मागील अंकांत सुमेरिआचे त्रोटक इतिहास खंड दिले आहेत. बाचकांच्या स्मरणांतून गेले नसतील अशी आशा आहे. तेथें असें सांगितले आहे की. सुमेरी वंशांतील लोकांचे राज्य सुमेरियात सुमारे ख्रिस्तपूर्व ४००० वर्षेपर्यंत चालल्यावर, त्यांच्यावर एका भिन्नवंशीय लोकांनी स्वारी करून तो देश जिंकला. हे जेते बॅबिलोनी म्हणून प्रसिद्ध