पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

१६ पैसाचे ऐवजी १८ पेन्स झाल्यामुळे येथे इंग्लंडमधील कापड १५० रुपयाने म्हणजे शेकडा १२३ टक्क्याने स्वस्त पडूं लागलें. ( यांत आपला फायदा होतो असे भासतें, परंतु त्यांत आपला खरा फायदा नाहीं, त्यामुळे आपले देशी उद्योगधंदे डबघाईला येतात. ) बाजारांत स्वस्त मिळेल त्या मालास मागणी जास्त. या सर्वसामान्य तत्त्वानुसार, परदेशचा माल स्वस्तं पडूं लागल्यामुळे त्याचा उठाव अधिक होतो. अर्थात् येथील कारखान्यांत तयार झालेला माल महाग पडूं लागल्यामुळे त्याचा खप कमी होतो, म्हणून येथील कारखानदार आपला उत्पादन खर्च कमी करापा म्हणून मजुरांचे दरांत कांट सुरू करतात. परंतु परदेशी मालाचा खप वाढल्यामुळे परदेशी माल अधिकाधिक स्वस्त देणें परवडतें, फिरून येथील कारखानदार आपले कारखान्यांतील कामगारांचे वेतनांत कांट करूनही न भागल्यामुळे कांहीं कामगारांना कामावरून कमी करतात, परंतु असें करूनही न भागल्यामुळे शेवटीं कारखाने बंद पडतात, अशा रितीने येथील कारखानदारवर्ग व कामकरीवर्ग नुकसानींत येतो.
 इंग्लंडमधील भांडवलदार वर्गानें : येथें बरेंच भांडवल गुंतविलेले आहे. त्याचें व्याज, नफा वगैरेचे रूपानें, व येथील सरकारी खाजगी नोकरीत अस- लेल्या परकीय नोकर वर्गाचे दरवर्षी कोट्यावधी रुपये इंग्लंडला जात असतात त्यांस इंग्लंडमध्ये १०० पौंड मिळण्याकरितां १६ पेन्खाचा रुपयाचा भाव असतांना जेथें १५०० रुपये देऊन १०० पौंडाच्या हुंड्या घ्याव्या लागत होत्या तेथें आतां १८ पेन्साचा भाव असल्यामुळे १३५० रुपयेच देऊन १०० पौंडाची हुंडी मिळते. म्हणजे केवळ रुपयाचा भाव १६ पेन्साचे ऐवजी १८ पेन्साचा ठेवल्यामुळे या वर्गाचा शेकडा १२१ टक्के फुकटा फुकटी फायदा होतो हें दिसून येईल. या चढत्या हुंडणावळीमुळे जर हिंदुस्थानचा कांहीं फायदा होत असेल तर एवढाच की हिंदुस्थान सरकारास, होम चार्जेस करितां इंग्लंडला प्रतिवर्षी पाठविणेच्या रकमेंत सुमारे अडीच ते तीन कोटि रुपयांची बचत होऊं शकते हा होय.