पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चढती हुंडणावळ इंग्लंडचे फायद्याची


निर्यात ३०० कोटि रुपयावर झाली नसती तर हा ( कागदी ) १८ पेन्साचाही दर सरकारास केव्हांच सोडावा लागला असता.
 अशी वस्तुस्थिती असतां सरकारनी हुंडणावळ चढीची ठेवण्याचा हेका धरण्यापासून इंग्लंडचा तरी काय फायदा होता, हें आपण पाहूं. मागें वर्णन केलेल्या जागतिक परिस्थितीत जगांतील बाजारांत इंग्लंडचे मालाला इतर देशाच्या मालाच्या स्पर्धेत टिकाव धरतां येऊन इंग्लंडमधील कारखाने चालू राहण्यास मालाचा उत्पादन खर्च कमी पडणे आवश्यक होते, तेव्हां कच्चा माल शक्य तितका स्वस्त मिळाला पाहिजे. हिंदुस्थान शेतीप्रधान देश असल्यामुळे व तो इंग्रजाचे सत्तेखाली असल्यामुळे पाहिजे त्यास पाहिजे तें करून येथील कच्चा माल इतर देशांतील भावांचे मानानें शक्य तितका स्वस्त मिळवितां येणें जरूर व शक्य वाटलें. शिवाय इंग्लंडमधील कापड वगैरे पक्का माल खपविण्यास हा ३५ कोट वस्तीचा देश एक हक्काची बाजारपेठ या नात्याने असणें अवश्य होतें. म्हणून कच्चा माल स्वस्त मिळण्याकरितां, व पक्का माल आपले ( इंग्लंडचे ) व्यापाण्याचे नुकसान न होता इतर देशाचे मानाने व खुद्द हिंदुस्थानांतील कारखान्यांत तयार होणारे मालाचे किंमतीचे मानाने स्वस्त पडण्याकरितां रुपयाचा भाव चढीचा ठेवणें हा एकच उपाय शक्य होता; म्हणून त्या मार्गांचा अवलंब करण्यांत आला.

चढती हुंडणावळ इंग्लंडचे फायद्याची

 रुपयाचा भाव चढीचा ठेवल्याने इंग्लंडचा फायदा कसा होतो. हें 33 क्ष खालील उदाहरणावरून स्पष्ट दिसून येईल. ने इंग्लंडहून १०० पौंड किंमतीचें कापड या देशांत आणलें असें आपण समजूं . हुंडणावळीचा दर १६ पेन्स असतांना सदर मालाबद्दल येथून १५०० रुपये पाठवावे लागले अमृते तें आतां १८ पेन्साचा भाव असल्यामुळे ( १०० पौंडाचे रुपये १३३३-५-४ होतात, परंतु हिशोबाचे सोईकरितां १३५० रुपये धरले आहेत ) १३५० च रुपये पाठवावे लागतात. म्हणजे इंग्लंडमधील व्यापाप्यांस १०० पौंड मिळावयाचे ते वरील दोन्ही परिस्थितीत मिळालेच; स्यांत इंग्लंडमधील व्यापाऱ्याचें कांहींच नुकसान झालें नाहीं. मात्र रुपयाचा भाव