पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

पेक्षां अधिक; असा जगावेगळा प्रकार येथे कां असावा याचा विचार करितां असें दिसून येतें, की हिंदुस्थान देश हा परतंत्र असल्यामुळे येथील चलनविषयक धोरण या देशाच्या हिताच्या दृष्टीने ठरविण्यांत येत नसून राज्यकर्त्यांच्या भाईबंदांच्या हिताच्या दृष्टीने ठरविण्यांत येत असतें. ही गोष्ट आपले ध्यानांत आली म्हणजे, ब्रिटिश अमदानीतील हिंदी चलन पद्धतीचें कोडे सुलभ रीतीनें उलगडलें जातें.
 १९१४ साली प्रचारांत असलेला रुपयाचा १६ पेन्साचा दर १९२० सालीं २४ पेन्सावर कायद्यानें कायम करून हिंदुस्थानचा ३५ कोटि रुपयांचे नुकसान करूनही २४ पेन्साचा भाव न टिकवतां आल्यामुळे हताश होऊन सरकारने हा प्रयत्न सोडून दिला, तरी पुन्हां १९२६ - २७ सालांत कायद्यानें रुपयाचा भाव १८ पेन्साचा ठरविण्यांत आला हा कृत्रिम दर टिकविण्याकरितां जागतिक मंदीमुळे हिंदुस्थान सरकारांस १८ पेन्साचा: १९२७ मार्च ते १९३१ सप्टेंबर पर्यंत चे कालांत, १५८ कोटि रुपयांचे खेळतें चलन प्रचारांतून कमी करावे लागलें, या अवर्धीत इंग्लंडमध्ये १०३ कोटि रुपयांची व हिंदुस्थानांत ५० कोटि रुपयांची अशी एकूण १५३ कोटि रु.ची कर्जे काढावी लागली. इम्पीरियल बँकेचा व्याजाचा दर शेकडा ८ पर्यंत वाढवावा लागला. तीन महिन्याच्या मुदतीच्या ट्रेझरी बिलांचा दर दरसाल दर शेकडा ७४ टक्क्यापर्यंत वाढवावा लागला. व असे करून देशांतील खेळतें चलन कमी करावें लागलें, आणि याचा साहजीक परिणाम असा झाला कीं, येथील पदार्थांचे भाव इतर देशांतील भावाचे मानाने स्वस्त राहिले, व शेतकरी व कारखानदार यांचे अतोनात नुकसान होऊन बेकारीचे प्रमाण वाढले. संपाचा सुळसुळाट झाला. शेतकन्यास त्याचे शेतांत उत्पन्न झालेल्या धान्यांचे किंमतींत सारा भरणे सुद्धां कठीण जाऊं लागले अशी परिस्थिति निर्माण झाली.
 सप्टेंबर १९३१ मध्ये इंग्लंडने आपल्या नाण्याचा सोन्याशीं असलेला संबंध तात्पुरता सोडला व हिंदुस्थानच्या रुपयाचा संबंध कागद पाँडाशी जोडण्यांत आला, व तेव्हांही एका रुपयास १८ ( कागदी) पेन्स हाच दर पुन्हा एकदां कायम करण्यांत आला, व गेल्या सहा वर्षांत येथील सोन्याची