पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हुंडणावळीचे दराविषयक वादाचे रहस्य

७५.

प्रमाणावर धान्य कापूस वगैरेचे उत्पादन वाढले, व कापडाच्या गिरण्या, मोटारी व इतर यंत्रसामुग्री यांच्या कारखान्यांचीही वाढ झपाट्याने झाली.
 जपाननें युरोपांतील महायुद्धांत पश्चिमात्य राष्ट्र गुंतलीं याचा फायदा घेऊन आपले देशांत उद्योगधंद्याची चांगलीच वाढ करून इंग्लंडचा पूर्वेकडील कापडाचा व्यापार बराच काबीज केला.
 जर्मनी व ऑस्ट्रिया या देशांना फ्रान्सला युद्धविषयक खंडणी दर वर्षी बरीच द्यावी लागत होती. व युरोपमधील बहुतेक राष्ट्रांनी इंग्लंड व अमेरिका या दोन राष्ट्रांकडून कर्जे घेतली होती. तसेंच इंग्लंडनेही अमेरिके-' कडून कर्ज काढलें होतें. त्या कर्जाचे हप्ते व व्याज़ दरवर्षी त्यांना बरेच द्यावे लागत होते. कांहीं राष्ट्रांस अजूनहि द्यावें लागत आहे. अर्थात ऋणको राष्ट्रें हीं देर्णी आपले देशांत उत्पन्न झालेला माल घनको राष्ट्रास देऊनच भागविणार हे उघड आहे. परंतु ऋणको देशांचा माल आपले देशांत आल्यास आपले देशांतील मालास भाव यावयास पाहिजे तितका न आल्यामुळे आपले देशांतील शेतकरी व कारखानदार बुडतील म्हणून घनको राष्ट्र संरक्षक जकातीचे तट उभारून परदेशी मालास मज्जाव व्हावा अशी योजना करूं लागले, व ऋणको राष्ट्रांनी आपले देणे सोन्याच्या ' रूपांतच दिले पाहिजे असा हेका धरूं लागले; व या रीतीनें देशांत आलेलें सोनें आपापल्या मध्यवर्ती बँकांच्या तिजोऱ्यांत अडकवून ठेऊ लागले.
 याचा परिणाम असा झाला की, जागतिक व्यापारी उलाढालींना आवश्यक तितकें सोनें व्यवहारांत खेळेनासें झालें व सर्वत्र बाजारभाव घटून जगभर मंदीची लाट फैलावली. यास तोड म्हणून हिंदुस्थानखेरीज जगांतील बाकीच्या राष्ट्रांनी आपापल्या चलनांच्या किंमती महायुद्धपूर्वकालीन चलनांच्या किंमतीच्या मानानें उतरविल्या. याचा हेतू हा कीं, इतर देशांच्या मालाच्या स्पर्धेचा आपणांस आपले देशांत झळ पोहोंचू नये. उतरती हुंडणावळ आयात मालास अटकविणारी असते, व निर्गत भालास सहाय्यक असतें हैं आपण मागे पाहिलेच आहे.
 याच्या उलट हिंदुस्थानच्या चलनाची किंमत महायुद्धकालपूर्व किंमती.