पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

ब्रिटन, युनायटेडस्टेटस्, जपान, फ्रान्स यासारख्या राष्ट्रांनी याच मार्गाचा अवलंब केला. आर्थिक विचार व आचार यांच्या बाबतींत पुढारलेल्या राष्ट्रानें अवलंबिलेल्या या मार्गाचें हिंदुस्थान सरकारने अनुकरण करावें अशी हिंदी व्यापारी संस्थांची मागणी होती व आजहि तीच आहे. १९३१ खालीं ग्रेटन्निटननें स्टर्लिन्गची किंमत उतरविल्यापासून आजतागायत तेथील बाजारभावांत जी सुधारणा झाली, तशी ती जोपर्यंत येथील बाजार- भावाची झाली नाहीं, तोपर्यंत हिंदी राष्ट्राची मागणी रुपयाची किंमत १८ पेनी स्टलिंग ठेऊं नका, ती बाजारभाव सुधारण्याकरितां जितकी उतरा- वयास पाहिजे तेवढी उतरवा, अशीच राहणार. आर्थिक परिषदेच्या अनु- षंगाने झालेल्या व्याख्यानांत पुण्याचे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रो. काळे यांनी हीच गोष्ट जाहीर रीतीनें सांगितली. "
 यावरून हिंदी चलनपद्धतीचा इतिहास, हुंडणावळीचे दराच्या बाबतच्या वादाचे रहस्य काय आहे हें पाहिल्याशिवाय पुरा होऊं शकत नाहीं, म्हणून आपण आतां त्या बाबतीचा थोडा विचार करूं-
 आंतरराष्ट्रीय व्यापार सुरळीत चालण्यास राष्ट्राराष्ट्रामध्यें परस्पर विश्वास असावा लागतो. तो महायुद्धानंतर राहिला नाहीं, व महायुद्धानंतरचे कालांत तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरळीत बसलेली घडी विस्कटली.
 प्रत्येक राष्ट्र, पुन्हां असे एखादें जागतिक युद्ध सुरू झाल्यास अन्नवस्त्रादि आवश्यक जिनसांच्या पुरवठ्याकरितां दुखऱ्या राष्ट्रावर आपणास अवलंबून राहण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून सदर जिनसांचें आपापल्या राष्ट्रांत शक्य तितक्या जास्त प्रमाणावर उत्पादन करण्याचा प्रयत्न करूं लागलें, व या कामी निरनिराळ्या राष्ट्रांतील शास्त्रज्ञ निरनिराळे शोध लावण्यांत गुंतले व याचा परिणाम असा झाला की, प्रत्येक राष्ट्रांत उत्पादन कल्पनेबाहेर वाढले.
 रशियामध्ये राज्यक्रांती होऊन समाज- सत्तावाद प्रस्थापित झाला व तेथेंही गहूं वगैरे धान्याचे उत्पादन फारच वाढले. भांडवल राष्ट्रीय माल- कीचें झाल्यामुळें, व भांडवलावर व्याज सुटणेचा प्रश्न नसल्यामुळे, तेथील माल जगाचे बाजारांत फारच स्वस्त मिळू लागला. युरोपियन राष्ट्रं महायुद्धांत गुंतली त्यावेळी अमेरिकेत युरोपियन राष्ट्रांना पुरविण्याकरितां फारच मोठ्या