पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हुंडणावळीचे दराविषयक वादाचे रहस्य

७३

मुळे निरनिराळ्या देशांतील व्यापारी देवघेव इतकी वाढली आहे, कीं,कोण- त्याहि देशाला इतरांपासून अलिप्त राहतां येत नाहीं. हिंदुस्थानच्या कच्च्या मालाचीं प्रमुख गिन्छ। इकें पाश्चिमात्य राष्ट्रांत असल्यामुळे त्या राष्ट्रांत प्रारंभ झालेल्या आर्थिक मंदीची छाया हिंदुस्थानवर पडण्यास मुळींच विलंब लागला नाहीं. उद्योगधंद्यांत पुढारलेली पाश्चिमात्य राष्ट्र ह्रीं मुळांत हिंदु- स्थानपेक्षां अनेकपट अधिक संपन्न असल्यामुळे त्यांतील सर्व साधारण रहि• वाशाला या आर्थिक मंदीचा जेवढा फटका बसला त्यापेक्षां अर्ध पोटीव अन परिस्थितीत राहणाऱ्या कोट्यावधि हिंदी लोकांना तो आधीं बसला. आतां पाश्चिमात्य राष्ट्रांतील व्यापारमंदी नाहींशी होऊन तेजीला प्रारंभ झाला असूनही हिंदुस्थान अजून मंदीच्या मगरा मिठीतून पडावा तसा बाहेर पडला नाहीं; यामुळें सद्यःस्थितीत तरी हिंदुस्थानच्या आर्थिक दैन्याचा दोन दृष्टींनी विचार करणें क्रमप्राप्त ठरले आहे.
 आजच्या बहुसंख्य हिंदी लोकांच्या निकृष्ट आर्थिक परिस्थितीचें आंशिक उत्तरदायित्व आर्थिक मंदीला आहे व तेवढ्या पुरता त्याचा स्वतंत्र विचार केला पाहिजे. आर्थिक दृष्ट्या पुढारलेल्या पाश्चिमात्य व पौर्वात्य राष्ट्रांनी आपल्या देशांतील बाजारभाव चढवून त्यांना तेजी आणण्याकरितां आपल्या नाण्यांच्या किंमती एका पाठीमागून एक झपाट्यानें उतरविल्या. ब्रिटिश पौंड स्टर्लिंग बरोबर हिंदुस्थानच्या रुपयाचे नशीब निगडित केल्या- मुळे ( सप्टेंबर १९३१ मध्ये ) स्टलिंगची सुवर्ण किंमत जितकी घसरली तितकी ती रुपयाचीहि घसरली; परंतु १९२७ सालीं सरकारनें कायद्यानें ठरविलेला रुपयाचा १८ पेनी भाव हाच हिंदुस्थानच्या आर्थिक परिस्थि- तीच्या  दृष्टीनें भारी असल्यानें त्याचें जें दडपण हिंदुस्थानावर होतें तें कायमच राहिलें, त्या दडपणांतून रुपयाला मोकळा करा व त्याचा भाव उतरवा अशी मागणी हिंदुस्थानांतील हिंदी व्यापारी संस्था व बरेचसे अर्थ- शास्त्रज्ञ यांनी केली. तिला डॉ. थॉमस यांचा विरोध होता व भागानगरच्या परिषदेत त्यांनीं तो व्यक्त केला.
 " नाण्याची किंमत प्रमाणबद्ध उतरांवेली तर त्याचा परिणाम बाजार- भाव वाढण्यांत होतो हा अर्थशास्त्राचा अगदी साधा सिद्धांत आहे. ग्रेट-