पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७ जानेवारी १९३८ चें पत्रक

७१

अगदी अलीकडील पत्रक हाताशी नसलें तरी सुमारें ३० ते ४० कोटि रुपयांचे आसपास स्टर्लिंग राखे व सोनें मिळून इंग्लंडमध्यें आहेत असें समजण्यास हरकत नाहीं. म्हणजे एकूण सुमारें ११० ते १२० कोटि रुपये हिंदी प्रजेचें कर रूपाने भरलेले इंग्लंडांत आहेत.
 हिंदी अर्थशास्त्रज्ञान व व्यापारी संस्थानों रिझर्व बँकेच्या स्थापनेच्या वेळी ( १९३४ - ३५ ) जी चळवळ केली तिचा एवढाच इष्ट परिणाम झाला की या दोन निधीमधील सोनें शक्य तोंवर हिंदुस्थानांतच ठेवण्याचें धारण सरकारास स्वीकारावें लागलें.