पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
हिंदी चलनपध्दतीचा इतिहास

१६ लक्ष रुपयांनी कमी करण्यांत आलें, त्यापैकी ४४ कोटि ६० लक्ष रुपयांच्या चलनी नोटा कमी करण्यांत आल्या व कागदी चलन निर्धीत वारण म्हणून जानेवारी १९२६ मध्ये ७७ कोटि २५ लक्ष रुपयाचे नाणें होतें त्याचे ऐवज सप्टेंबर १९३१ मध्ये १२६ कोटि ८१ लक्ष रुपये झाले, म्हणजे सुमारे ४९ कोटि ५६ लक्ष रुपयाचें खेळतें नाणें कमी करून सदर निर्धात साठविण्यांत आले. या शिवाय तीन महिन्याच्या मुदतीची ट्रेझरी बिले दर आठवड्यास आपले चालू खर्चाकरितां सरकार काढीत असतें; तीं जरूरीपेक्षां अधिक काढूनही तात्पुरतें खेळतें चलन कमी कर- ' ण्याचा एक मार्ग असतो. त्याही मार्गाने सुमारे ६४ कोटि रुपयाचें चलन प्रचारांतून कमी करण्यांत आलें होतें. या सर्व प्रकारांनी मिळून सुमारें १५८ कोटि रुपये खेळत्या चलनांतून कमी करण्यांत आले होते.

७ जानेवारी १९३८ चे पत्रक.

 कागदी चलन निधीविषयक ७ जानेवारी १९३८ रोजी रिझर्व बँकेनें काढलेल्या पत्रकावरून हल्लीं एकूण २१२ कोटि ९४ लक्ष १० हजार रुपयांच्या कागदी नोटा काढलेल्या आहेत असें दिसतें; पैकी २६ कोटि ९४ लक्ष ९० हजार रुपयांच्या चलनी नोटा बँकेच्या तिजोरीत असून, १८० कोटि ९५ लक्ष ८४ हजार रुपयांच्या चलनी नोटा हिंदुस्थानांत व ५ कोटि ३ लक्ष ३६ हजार रुपयांच्या चलनी नोटा ब्रम्हदेशांत खेळत्या आहेत.
 या चलनी नोटांस तारण ४१ कोटि ५४ लक्ष ५३ हजार रुपयांचें सोनें हिंदुस्थानांत व २ कोटि ८६ लक्ष ९८ हजार रुपयांचे सोनें इंग्लंड- मध्ये आहे. याशिवाय ६२ कोटि ३० लक्ष ९४ हजार रुपयांचे नाणें बँकेच्या तिजोरींत आहे. तसेंच हिंदुस्थान सरकारने काढलेल्या कर्जरोख्या पैकीं २७ कोटि ४० लक्ष ९५ हजार रुपयांचे कर्जरोखे हिंदुस्थानांत व ७८ कोटि ८० लक्ष ७० हजार रुपये किंमतीचे स्टर्लिंग राखे इंग्लंडमध्यें - आहेत.
 या पत्रकावरून कागदी चलन निधींतील सोनें व स्टर्लिंग राखे मिळून सुमारें ८१ कोटि रुपये इंग्लंडमध्ये आहेत. व सुवर्ण परिमाण निधी