पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण पांचवें
हिंदुस्थानातील खेळत्या चलनाचे प्रसरण व अकुंचन:-

 इ. स. १९१४ ते १९२० चे दरम्यान महायुद्धामुळे या देशांतून पर- देशी बराच माल गेला, व त्या प्रमाणांत आयात मात्र झाली नाहीं. म्हणून हिंदुस्थान धनकोच्या स्थितीत होतें, हें आपण मार्गे पाहिलेच आहे.
 त्या मालाची किंमत स्टेट सेक्रेटरीनें तेथील व्यापान्यांकडून सोन्याचें रूपांत घेऊन हिंदुस्थान सरकारवर रुपयांच्या हुंड्या काढल्या, त्या हुंड्या येथील व्यापान्यांकडून हिंदुस्थान सरकारकडे वटविण्यास आल्या, त्या वट- विण्याकरितां सरकारास नवीन नोटा व रुपये काढावे लागले, मार्च १९१४ मध्ये ६६ कोटि १२ लक्ष रुपयांच्या नोटा प्रचलित होत्या, तेथें १९२० जानेवारीस १८५ कोटि १५ लक्ष रुपयांच्या नोटा प्रचलित असल्याचें कागदी चलननिधि मार्गे दिलेल्या पत्रकावरून दिसून येते. म्हणजे या ६ वर्षांत सुमारे ११९ कोटि रुपयांचे अधिक चलन खेळते राहिलें.
 उलटपक्ष १९२१-२२ सालांत २४ पेन्सावर रुपयाचा भाव टिक- विणें करितां रिव्हर्स कौन्सिल बिले हिंदुस्थान सरकारास स्टेटे-सेक्रेटरीवर काढावी लागल्यामुळे, सोन्याचा संचय कमी झाला. त्याकरितां खेळतें चलन सुमारें ५४ कोटि रुपयाचे कमी करण्यांत आलें, त्यापैकी सुमारे १३ कोटि रुप- यांचे कागदी चलन कमी केलें व खेळत्या चलनी नोटास तारण म्हणून १९२० जानेवारीत २८ कोटि ३८ लक्ष रुपये होते, तेथे ६९ कोटि ७६ लक्ष रुपये डिसेंबर १९२१ मध्ये असल्याचे आपणांस मागील कागदी चलन निधीचें पत्रकावरून दिसून येतें. म्हणजे सुमारें ४१ कोटि रुपयांचे खेळते रुपयांचें नाणें कमी करून ते या निधीत सांठविण्यांत आलें.
 तसेंच १८ पेन्साचा रुपयाचा कायदेशीर भाव, खाली जात असतांही हाच भाव : राखण्याचा अट्टाहास करण्यातः जानेवारी १९२६ ते सप्टेंबर १९३१ पर्यंत निर्गत व्यापार मंदावल्यामुळे खेळतें चलन सुमारे ९४ कोटि