पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना

 चलन, हुंडणावळ, व परराष्ट्रीय व्यापाराचे व्यवहार या संबंधाचा विषय अतिशय गुंतागुंतीचा व अवघड आहे. त्याचें नीट आकलन होण्यास पैसा, पत आणि बाजारभाव या संबंधांतले अर्थशास्त्रीय सिद्धातांचें थोडें तरी ज्ञान आवश्यक असतें. हिंदुस्थानच्या आर्थिक परिस्थितीशीं वरील विषयाचा जिव्हाळ्याचा संबंध असतो. सामान्य माणसास मात्र त्याचें रहस्य उकलणें अत्यंत कठीण होते. हिंदी परराष्ट्रीय हुंडणावळीचा दर १६ पेन्स असावा की १८ पेन्स असावा याबाबत चर्चा चालली असतां तिच्यातले मर्म समजण्याची सामान्य लोकांची तीव्र इच्छा असूनहि ती तृप्त होण्याचें साधन नाहीं, अशी स्थिती होते, त्या दृष्टीनें पाहतां श्रीयुत लोहोकरे यांचा प्रस्तुत प्रयत्न स्वागत करण्यासारखा आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.
 हातीं घेतलेल्या महत्त्वाच्या प्रश्नाचे विवेचन त्यांनी सोप्या व सुबोध पद्धतीनें केलें आहे. विषयाचें स्वरूप लक्षांत घेतां त्यांचें कांहीं ठिकाण चें विवेचनहि सूत्रवत्, दुर्बोध व क्वचित् सदोषहि वाटण्याचा संभव आहे. तथापि हैं अपरिहार्य आहे. आणि वस्तुतः त्यातला दोष लेखकापेक्षां पुस्त- काची मर्यादा आणि प्रतिपाद्य विषयाचें अवघड स्वरूप याचाच विशेष आहे. चर्चावयाच्या प्रश्नाच्या मुळाशी असलेली सामान्य आर्थिक तत्त्वें आणि हिंदी चलन पद्धतीचा इतिहास यांचा श्रीयुत लोहोकरे यांनी योग्य समाचार घेतला असून आज त्या पद्धतीची स्थिती काय आहे हे स्पष्टपणानें सांगितलें आहे. हिंदुस्थानच्या राजकीय व आर्थिक परावलंबनामुळे आमची चलनव्यवस्था विशिष्ट ठशाची कां झाली, त्याचे विवेचन त्यांनी सविस्तर आणि मार्मिकपणानें केलें आहे. त्यावरून सरकारच्या चलनविषयक धोर- णावर होणाऱ्या हिंदी लोकमताच्या प्रतिकूल टीकेवर स्वच्छ प्रकाश पडतो.
 आर्थिक विषयांच्या ज्ञानाचा प्रसार जनतेमध्ये होणें अगत्याचे आहे, जाणून त्या दिशेने प्रयत्न करणारांपैकी मी असल्याने प्रस्तुत पुस्तकाचै