पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महायुद्धकालीन परिस्थिती

६१

मिळेना असा प्रकार घडला. वरील प्रकारच्या परत हुंड्यामुळे ३५ कोटि रुपये हिंदुस्थानचे गेले. या वरील विवेचनावरून संकटाचा उद्भव सरकारी → हुंडयांत आहे असें दिसून येईल.
 असें न होण्यास उपायः - स्टेट सेक्रेटरीनें आपल्या गरजेपेक्षां जास्त रकमेच्या हुंडया सहसा काढू नयेत. विलायतेंत सोनें न ठेवतां सोन्याचा हिंदुस्थानांत येण्याचा मार्ग खुला करावा. हिंदुस्थानांत सोन्याचे नाणे सुरू करावें. चांदीचा भाव कमजास्त होतो तसा सोन्याचा होत नाहीं. सोन्यारुप्याचा भाव ठरविण्याचा प्रयत्न करूं नये. विलायतचा खर्च शक्य तितका कमी करावा, १० रुपयास १ सॉव्हरिन हा भाव ३५ कोटि रुपयांचे नुकसान सोसूनही टिकला नाहीं. ह्यावरून कृत्रिम रीतीनें रुपयाचा भाव वाढवून हिंदुस्थानचें हित साधणार नाहीं, म्हणून तसें करूं नये; असा येथील तज्ञांचा सरकारास सल्ला असतो. परंतु तिकडे सरकार लक्ष देत नाहीं; च १९२७ सालीं असाच कृत्रिम रीतीनें रुपयांचा भाव १८ पेन्स टिकवि- नण्याचा प्रयत्न करून हिंदुस्थानचे कसें नुकसान झालें, हैं हुंडणावळविषयक बादाचे रहस्याचा विचार करतांना आपणांस दिसून येईल.