पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

करावयाचे म्हणजे लोकांजवळचे रुपये कमी करावयाचे. हे रुपये कमी करण्याचा उपाय म्हणजे " रिव्हर्स कौन्सिल बिलें " - परत हुंडया - काढणे हा होय. अशा हुंड्यामुळे लोक हिंदुस्थान सरकारास रुपये देतात व हुंडी विकत घेतात; आणि ती हुंडी भारतमंत्र्यावर लागू करून त्याच्याकडून १ रुपयास २ शिलिंगप्रमाणें सोनें घेतात, अशा रीतीनें देशांतील खेळते रुपये कमी होतात.
 ह्याशिवाय आपल्या शिलकेतील सोनेंही हिंदुस्थान सरकारने विक्रीस काढले. हेतू हा कीं सोनें स्वस्त व्हावें व रुपये दुर्मिळ व्हावेत. करन्सी कमिटीने " परत हुंडया " काढण्याची सूचना केली होती तिचा सरकारने ताबडतोब फायदा करून घेतला.
 आतां यामध्ये नुकसान काय झालें तें बघू १५ रुपयास १ पौंड दरानें आजपर्यंत जे सोनें सांचविलें तें सर्व १० रुपयास १ पौंड या दराने देऊन टाकले. अशा रीतीनें दर पौंडाच्या मार्गे ५ रुपये नुकसान झालें. दर आठवड्यास २० लाख पौंड याप्रमाणें कित्येक महिनेपर्यंत परत हुंड्या विकून सरकारने सर्व सोन्याची विल्हेवाट लावली. बरे यामुळे फायदा तरी कोणाचा झाला ? तर विलायती व्यापाऱ्यांचा. कारण हिंदुस्थानांतील व्यापा- यांना पाहिजे होत्या, त्यापेक्षां कितीतरी अधिक परत हुंड्या सरकारने काढल्या. मग ह्या परत हुंड्या कोण घेणार ? व त्यापासून फायदा कोणाचा होणार ? तर इंग्लिश व्यापाऱ्यांचा व येथें असणान्या इंग्लिश लोकांचा. बाजारांत १ रुपयास १५ पेन्स मिळतात, पण सरकार २४ पेन्स देते. इंग्लिश लोकांची घरेदारे विलायतेत, तेथे त्यांना सोनें पाहिजेच; तेव्हां ही आलेली संधि कोणीही फुकट जाऊं देणार नाहीं. येथे पसरलेले रुपये सर्व गोळा करून त्यांनी थोडक्या पैशांत सोन्याचा संचय विलायतेंत केला. शिवाय बाजारभाव व सरकारी भाव यांत इतकी तफावत पडल्यावर सट्टेबाजी करण्यासही पुष्कळांस संधि मिळाली. हलक्या दराने सरकारकडून सोनें विकत घेऊन वे बाजारांत अधिक दरानें विकण्यास मुळींच हरकत नव्हती, व त्याप्रमाणे लोकांनी केलेही. विलायतेतील लोकांस १६ रुपयास १ तोळा सोने मिळाले आणि हिंदुस्थानांत वाळ्यास २२ रुपये देण्यास लोक तयार असून त्यांस