पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महायुद्धकालीन परिस्थिती

५९

खांदीची खाजगी आयात झाली ) यामुळे हिंदुस्थानांत सोनें यावें तितकें आलें नाहीं. चांदी महाग झाली.
 १९१५ च्या ऑक्टोबरमध्ये चांदीचा दर औसास २४ पेन्स भाव होता, तो १० मे १९१९ रोजी ५८ पेन्सांचा झाला. आतां एक औंस चांदीस २४ पेन्स भाव असला म्हणजे एक रुपयांतील ( १६५ ग्रेनांची ) चांदीची किंमत जवळ जवळ ९ पेन्स असते; आणि ५८ पेन्साप्रमाणे भाव असतां सुमारें २१३ पेन्स होते. त्यावेळी रुपयाचा हुंडणावळीचा दर १६ पेन्स होता. अर्थात् रुपयांतील चांदीची किंमत २१३ पेन्स तर रुपयाची किंमत १६ पेन्स अशी स्थिति झाली. रुपये पाडण्यांत सरकारचा आजपर्यंत नफा होत होता, तो न होता उलट तोटा होऊं लागला. एक रूपया पाडण्यास २२ पेन्स खर्च; पण तो पाहून त्याची किंमत १६ पेन्सच येणार, यामुळे सरकारने हुंडणावळीचा दर म्हणजे रुपयाचा भाव २४ फेसपर्यंत वाढविला.
 १८९३-९४ सालीं वांदीचा भाव फारच उतरला, म्हणून सरकारास अडचण झाली. पुढे १९१८ सालानंतर चांदीचा भाव कडकल्यामुळें विषंचना उत्पन्न झाली. १९१७ च्या ऑगस्टपर्यंत रुपये पाडण्यांत सरकारचें नुकसान नव्हतें. पण पुढे चांदीचा भाव भडकल्यामुळे सरकारास नुकसान लागूं लागलें. इकडे सोने महाग झालें, म्हणून १ रुपयांस २ शिलिंग सोने हा दर बॅबिंग्टन कमिटीने कायम केला. चांदी उतरण्याचा संभव नाहीं, असें कमिटीला वाटले, सोने घेऊन लोकांना रुपये देण्यांत आपलें नुकसान होते असें पाहतांच सरकारी हुंड्याचा हात भारतमंत्र्यानें आंखडून घेतला. पण पुढे कमिटीचें भविष्य लवकरच खोदें ठरलें, चांदी झपाट्यानें उतरूं लागली. रुपयास २ शिलिंग हा दर तर सरकारने जगजाहीर केला व तो कायम ठेवण्याकरितां वाटेल ते करण्यास सरकार तयार झालें. रुपयाचा १५-१६ पेन्सापर्यंत गेलेला दर खेचून २४ पेन्सावर आणण्याची खटपट करण्याचा सरकारचा निश्चय झाला. रुपया स्वस्त झाला व सोनें महाग झालें. म्हणून रुपयाचा भाव २४ पेन्सावर राहिना. तेव्हां रुपये महाग करावेत आणि खोने स्वस्त करावे हा मार्ग त्यांनी काढला. रुपये महारा