पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुवर्णविनिमय परिमाणनिधी

५५

असल्याने रुपया - सान्याचा दर कायम ठेवण्यास सोनें देण्याची पाळी आल्यास अधिक मदत होईल. यावर उलट म्हणणें असें आहे कीं, कागदी चल नाच्या ऐवजी तितकीच रोकड ठेवण्याचा उद्देश इंग्लंडांत सोनें ठेवल्यानें सफल होत नाहीं. कागदाला किंमत नाहीं. त्याचे वाटेल तेव्हां रुपये मिळतील असा भरवसा असल्यामुळे कागदाच्या चिटोन्यांना एक हजार, दहा हजार रुपये असेच समजून लोक ते वापरतात. पण जेथें कागदी चलन तेथेंच हा निधी नाहीं, तर प्रसंगाला त्या निधीचा कांहीं उपयोग होणार नाहीं. तसेंच चांदी विकत घेण्याकरितां सोनें ठेवणें तें नियमित प्रमाणांत ठेवता येण्यासारखे आहे. परंतु चांदी लंडनचेच बाजारांत कां घ्यावी ? येथील बाजारांतच चांदी घेणेचे ठरविल्यास चांदीचे व्यापारी लंडनचे ऐवजीं येथील बाजारांतच चांदी खास आणू लागतील. त्याचप्रमाणें निर्गतीहून आयात माल फारच अधिक असा प्रसंग फारच क्वचित येतो. कागदी- चलन, निधीपैकीं विलायतेंतील सोनें बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेविलें जातें. या नंतर नियमित रकमेपर्यंत रोकडी ऐवजी रोपे ठेवण्यास सवलत कायद्यानें दिली असल्यामुळे त्याचाही फायदा इंग्लंडलाच मिळतो.
 सन १९९२ पासून चार कोटि रुपये विलायतेंत कर्जात अडकविले होते. या देशांत मिळते तितकें व्याज इंग्लंडमध्ये मिळत नाहीं; येथे ५३ टक्के पर्यंत मिळू शकते ! पण विलायतेंत २३ टक्के व्याजाचे कर्जरोखे घेणें प्राप्त होतें. म्हणजे चार कोटि रुपये विलायती व्यापाऱ्यांना हलक्या व्याजानें वापरण्यास सांपडतात.

सुवर्णविनिमय परिमाणानिधी
( Gold Standard Riserve )

 आतां आपण सुवर्णविनिमय परिमाणनिधीचा विचार करूं. हा निधी प्रथम सोन्याचे नाणें हिंदुस्थानांत सुरू करण्याच्या उद्देशानें स्थापित झाला व रुपये पाडून जो नफा होईल त्या नफ्यांतून हा सुवर्णनिधि निर्माण करणेचे ठरलें, या निधीस जरी " गोल्ड स्टँडर्ड रिझर्व्ह " म्हणतात, तरी यांत कांहीँ रुपयेहि ठेवलेले असत. तेव्हां सुवर्णनिधी हें नांव अगदी सार्थ हो