पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ 8 ]

श्रीयुत माधवराव कुलकर्णी, हेडमास्तर, म्युनिसिपल शाळा नंबर १ श्रीयुत रा. ह. पटवर्धन इन्कमटॅक्स एस्कपर्ट, श्रीयुत ल. ह. कुलकर्णी वकील, श्री. राजवाडे साठे वगैरे सोलापूरचे व भोरचे, श्रीयुत लक्ष्मणदास माधवदास देवी वकील, व श्रीयुत रामचंद्र भालचंद्र फडणीस वकील, व पुण्याचे श्री. पां. गो. साने माजी संपादक 'गोरक्षण' वगैरे स्नेही मंडळींनी वेळोवेळी हस्तलिखितें तपासून ज्या उपयुक्त सूचना करून जें उत्तेजन दिलें तसेंच बालोद्यान प्रेसचे मालक श्री. बाबूराव सहस्रबुद्धे यांनी पुस्तक छापण्यास मदत केली त्याबद्दल लेखक त्यांचा अत्यंत ऋणी आहे. शेव, लेखकाचे वडील श्रीयुत वासुदेव लक्ष्मण लोहोकरे व चुलते श्री. रा. अनंतदास रामदासी यांनी दिलेल्या प्रोत्साहनाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून हे लिखाण हातावेगळे करीत आहे.

सोलापूर, नवी पेठ मोडकवाडा,

घर नंबर ४६

ता. १४-२-१९३८

यशवंत वासुदेव लोहोकरे,